टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही काळापासून कॅन्सरशी लढा देत आहे. दीपिकाच्या लिव्हरला गाठ असल्याचं आढळल्यानंतर ती कॅन्सरची असल्याच...
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही काळापासून कॅन्सरशी लढा देत आहे. दीपिकाच्या लिव्हरला गाठ असल्याचं आढळल्यानंतर ती कॅन्सरची असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर दीपिकावर सर्जरी करण्यात आली होती.सध्या ती कॅन्सरवर उपचार घेत असून बरी होत आहे. या कठीण काळात दीपिकाला तिचा पती शोएब इब्राहिमची साथ लाभली. शोएब दीपिकासोबत खंबीरपणे उभा होता.
शोएबचा नुकताच वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी दीपिकाने खास पोस्ट लिहिली. हॉस्पिटलमधला शोएबसोबतचा फोटो तिने शेअर केला. "तुझी साथ लाभणं हा आयुष्यातला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. कोणतीही परिस्थिती असू दे...तुझी साथ असेल तर मी सगळ्याला सामोरी जाईन. माझा सगळ्यात मोठा पाठिंबा, माझी ताकद, माझं आयुष्य...हॅपी बर्थडे शोएब... तुला द्यायला आता माझ्याकडे काहीच नाही. माझी झोळी रिकामी आहे. पण, प्रत्येक प्रार्थना तुझ्यासाठी आहे", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कॅन्सरवर उपचार घेत असतानाच दीपिकाच्या पोटात पुन्हा गाठ आढळली होती. सध्या अभिनेत्री इम्युनिथेरेपी घेत आहे. दीपिका आणि शोएबने २०१८ मध्ये लग्न केलं. दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. दीपिका आणि शोएबला एक मुलगा देखील आहे. हेल्थ अपडेट्स दीपिका तिच्या व्लॉगमधून चाहत्यांना देत असते.


COMMENTS