विशेष प्रतिनिधी | प्रा. निलेश आमले जुन्नर २१जून : महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म स्थानी शिवनेरी किल्ल्...
विशेष प्रतिनिधी | प्रा. निलेश आमले
जुन्नर २१जून : महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म स्थानी शिवनेरी किल्ल्यावर योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतासह जगभरात साजरा करण्यात येणारा १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा झाल्याची माहिती श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नरचे प्राचार्य डॉ. एम.बी.वाघमारे यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये 36 महाराष्ट्र बटालियन एनसीसी पुणे चे कमांडिंग ऑफिसर कर्नल निषाद मंगरुळकर, लेफ्टनंट कर्नल हेमचंद्र बी, सुबेदार मेजर रमाकांत सिंह,भारतीय पुरातत्त्व विभाग उपमंडळ जुन्नरचे श्री गोकुळ दाभाडे,श्री सुरेश तारडे,श्री हर्ष कुशवाह,श्री लाभार्थ गुप्ता, श्री शिव छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे,एनसीसी विभागाचे प्रमुख डॉ.कॅप्टन बाबासाहेब माने,प्रा.विक्रम रसाळ, प्रा. निलेश आमले,प्रा.रेखा गायकवाड, प्रा.सोनम ताजणे तसेच इतर महाविद्यालयातून आलेले कॅप्टन दिलीप शिवणे, लेफ्टनंट निलेश हांडे, लेफ्टनंट शशिकांत भगत,लेफ्टनंट रमेश गावडे,सेकण्ड ऑफिसर रोहित भागवत,सेकण्ड ऑफिसर दत्तात्रय चासकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर, अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर, बीजे कॉलेज आळे, बीडी काळे कॉलेज घोडेगाव, अण्णासाहेब वाघिरे कॉलेज ओतूर,एसीएस कॉलेज नारायणगाव,जीआरपीएस विद्यामंदिर नारायणगाव,एमजी विद्यालय मंचर येथील सुमारे 400 छात्र सैनिकानी यांमध्ये सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर यांचे वतीने करण्यात आले होते. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने योगाभ्यास करून कार्यक्रमाचे आकर्षण वाढविले. योग प्रशिक्षक प्रा. विक्रम रसाळ व प्रा. निलेश आमले यांनी पुरक हालचाली घेऊन वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन,वज्रासन,भुजंगासन, बालासन प्राणायाम आदी योग प्रकारचे महत्त्व सांगून योगासने करवून घेतली.
तसेच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे,उपाध्यक्ष श्री निवृत्तीशेठ काळे, सर्व संचालक मंडळ व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी, शिक्षक,व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे योगदान लाभले.






COMMENTS