राजगड तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; धनगरवाड्यांमध्ये गंभीर परिस्थिती | CrimeNama
Loading ...

राजगड तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; धनगरवाड्यांमध्ये गंभीर परिस्थिती

  वेल्हे: पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या राजगड तालुक्यात यंदा जून महिना संपत आला, तरी मान्सूनपूर्व किंवा मान्सूनचा पाऊस झालेला नाही. ...

 


वेल्हे: पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या राजगड तालुक्यात यंदा जून महिना संपत आला, तरी मान्सूनपूर्व किंवा मान्सूनचा पाऊस झालेला नाही. परिणामी, तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, हजारो नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.रुळे गावातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या काळूबाई व भोपळी धनगरवाड्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. स्थानिक जलस्रोत पूर्णपणे आटल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रशासनावर अवलंबून राहावे लागत आहे. तालुका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात पिकअप जीपद्वारे दररोज सुमारे एक हजार लिटर पाण्याचा पुरवठा सुरू केला असला, तरी तो अपुरा ठरत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.


डोंगराळ भागातील कच्चे रस्ते आणि मोठ्या प्रमाणावर असलेले दगड-गोटे, यामुळे पाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच या रस्त्यावरील मोठमोठे दगड बाजूला करताना एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनांना हादरे बसून पाणीगळतीही होत असल्याने प्रत्यक्षात ग्रामस्थांपर्यंत कमी पाणी पोहचत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.


या भागात काही वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या शिवकालीन पाणी साठवण योजनेअंतर्गत उभारलेली तळी सध्या कोरडी पडली आहेत. तसेच तळी, विहिरी आणि इतर पाणवठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने त्यांची पाणी साठवणक्षमता लक्षणीयरीत्या घटली आहे. गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुळेच्या सरपंच शुभांगी हळंदे आणि ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागांकडे गाळ काढण्यासाठी निधीची मागणी केली.


मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाने आणखी विलंब केल्यास येत्या काही दिवसांत पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तळी आणि विहिरींचे गाळमुक्तीकरण तातडीने करून पाणी साठवणक्षमता वाढविणे आवश्यक आहे. तसेच, डोंगरवाडी भागांसाठी कायमस्वरूपी जलपुरवठा योजना राबविण्याची मागणीही जोर धरत आहे.


COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4835,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1771,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,963,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,379,Maharashtra,2142,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,753,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: राजगड तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; धनगरवाड्यांमध्ये गंभीर परिस्थिती
राजगड तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; धनगरवाड्यांमध्ये गंभीर परिस्थिती
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjBm-G1Sg3Up2mwGO_fkVrUT8e_lvWZdGFc15Io89mWMCnF-wSDSdbaLLTkLwMvsF_laS0r-JLeqQEZfMdwnjO49yVwaCuoqgaOV17K9IqvHXUTWUnznZFSZ_G9KqXEnW26x1MuVWhuQ4tXA37IX-HdHeHDlOqS3_QIyN4fJCHDuGAbug5J1mVkVC6vKsA/s320/IMG_20260621_124358.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjBm-G1Sg3Up2mwGO_fkVrUT8e_lvWZdGFc15Io89mWMCnF-wSDSdbaLLTkLwMvsF_laS0r-JLeqQEZfMdwnjO49yVwaCuoqgaOV17K9IqvHXUTWUnznZFSZ_G9KqXEnW26x1MuVWhuQ4tXA37IX-HdHeHDlOqS3_QIyN4fJCHDuGAbug5J1mVkVC6vKsA/s72-c/IMG_20260621_124358.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_21.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_21.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content