उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील लक्सरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणाने मुलीला शेतात नेऊन तिच्यावर ...
उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील लक्सरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणाने मुलीला शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिचा शोध घेत तिची बहीण घटनास्थळी पोहोचली असता, ती हतबल झाली.कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी नराधमाविरूद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
खाकी वर्दीला बट्टा! तक्रार दाखल करण्यास गेलेल्या महिलेवर पोलिसाकडून अत्याचार
नेमकं काय घडलं?
लक्सर कोतवाली परिसरात एका गावातील महिलेनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली, तिची 11 वर्षांची पीडित मुलगी ही घटनास्थळी पोहोचल्यानंतर पीडितेची परिस्थिती पाहून ती पूर्णपणे हादरून गेली. मुलगी गावातील सरकारी शाळेजवळ खेळताना हा धक्कादायक प्रकार घडला होता.मुलीचे तोंड दाबून उसाच्या शेतात नेत लैंगिक अत्याचार
अशातच गावातील एक तरुणाने मुलीचे तोंड दाबून तिला जवळच्या उसाच्या शेतात नेले, नंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेदरम्यान पीडितेच्या मामाची मुलगी ही घटनास्थळी आली असता, तिने पीडितेची परिस्थिती पाहिली आणि तिला मोठा धक्का बसला.मामाच्या मुलीचा हाक ऐकून पीडित मुलगी शेतातून अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेर पडली होती. पीडिता घरी पोहोचल्यानंतर तिने आपल्या कुटुंबीयांना तरुणीच्या कृत्याबाबत सांगितलं. महिलेनं आरोपी तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, या घटनेनं पूरता परिसर हादरून गेला होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रवीण सिंह कोश्यारी यांनी सांगितलं की, तक्रारीच्या आधारे आरोपीविरूद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


COMMENTS