कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात, गावातील एका विधवेशी संबंध ठेवण्यासाठी तरुणाने बायकोची हत्या केली. संबंधित प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आह...
कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात, गावातील एका विधवेशी संबंध ठेवण्यासाठी तरुणाने बायकोची हत्या केली. संबंधित प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.गोकाक तालुक्यातील शिंदिकुरबेट गावातील रहिवासी सक्कबाई पटायत असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. तसेच खून केलेल्या आरोपी नवऱ्याची संतोष पटायत अशी ओळख उघडकीस आली.
संतोष आपल्या बायकोला एका मंदिरात घेऊन गेला, मंदिरातून परतताना संतोषने एका शीतप्येयात उंदीर मारण्याचे औषध मिसळले. नंतर तेच औषध सक्कुबाईला दिल्याचा आरोप आहे. नंतर सक्कुबाईल बेशुद्ध पडली असता, तिला रस्त्याच्या एका कडेला गळा दाबून फेकून देण्यात आल्याचा आरोप करण्यापोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीच्या मृतदेहावरून आपली मोटारसायकल टाकून हत्येचा प्रकार असल्याचा बनाव रचला. घडलेल्या घटनेनुसार, तो स्वत: पोलीस नियंत्रण कक्षेला फोन करण्यापूर्वी बराच वेळ रस्त्याच्या कडेला थांबून होता. सक्कुबाईच्या मृत्यूबाबत संशय आल्याने, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगावी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स येथे पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालातून ही हत्या असल्याचं उघडकीस आले. तपासातून माहिती समोर आली की, धारवाड तालुक्यातील कल्लर गावातील रहिवासी संतोष आणि सक्कुबाई यांचा विवाह नऊ वर्षांपूर्वी झाला होता. गेल्या काही वर्षांपासून गावातील एका विधवेशी प्रेमसंबंध होते. संतोषला अटक करून हिंदळगा तुरुंगात पाठवण्यात आले. या हत्येत विधवा महिलेचा काही संबंध आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.


COMMENTS