प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे जुन्नर तालुक्यातील येडगावजवळील कैलासनगर परिसरात आज रात्री एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याची घटना समोर आली आहे. या घट...
प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे
जुन्नर तालुक्यातील येडगावजवळील कैलासनगर परिसरात आज रात्री एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी कैलासनगर परिसरात दोन बिबटे मुक्तपणे फिरताना काही नागरिकांच्या निदर्शनास आले. वस्तीजवळ बिबट्यांचा वावर असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी सावधगिरी बाळगत ही माहिती इतर ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली. या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून नागरिकांना रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जुन्नर तालुका हा बिबट्यांच्या अधिवासासाठी ओळखला जातो. येडगाव व परिसरातील ऊस शेती, झाडी आणि पाण्याचे स्रोत यामुळे बिबट्यांचा वावर अधूनमधून आढळून येतो. मात्र एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याने नागरिकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे.
नागरिकांनी विशेषतः लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये, पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच रात्रीच्या वेळी टॉर्चचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. बिबट्यांचे दर्शन झाल्यास घाबरून न जाता वनविभागाला तात्काळ माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


COMMENTS