पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचरजवळील निघोटवाडी फाटा येथे एका युवतीला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात फेकून दिल्याची व त्यानंतर आरोपी युवकाने स...
पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचरजवळील निघोटवाडी फाटा येथे एका युवतीला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात फेकून दिल्याची व त्यानंतर आरोपी युवकाने स्वतः पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आरोपीला स्थानिकांनी वाचविले असले तरी युवतीचा मृत्यू झाला आहे. सुमारे 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर या युवतीचा मृतदेह सापडला आहे. मंचर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
रमेश बबन कडाळे याने रविवारी सायंकाळी स्वप्नाली भांगरे या युवतीसोबत झटापट करून तिला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात ढकलल्याचा आरोप आहे. स्वप्नाली भांगरेला पाण्यात ढकलल्यानंतर आरोपी रमेश कडाळेने स्वतः पाण्यात उडी मारली होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर आरोपी रमेश कडाळेला स्थानिकांनी वाचविले होते. मात्र, स्वप्नाली ही तरुणी पाण्यात वाहून गेली होती.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम राबविली. तब्बल 18 तासांनंतर सोमवारी स्वप्नाली भांगरे चा मृतदेह सापडला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रमेश बबन कडाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.


COMMENTS