नगदवाडी ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत शैक्षणिक वर्ष 2026/27 च्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्...
नगदवाडी ता.जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत शैक्षणिक वर्ष 2026/27 च्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना पाठ्यपुस्तके,शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य,खाऊ,गुलाबपुष्प व फुगे देऊन स्वागत करण्यात आले.अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला बोऱ्हाडे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषद पुणेच्या सदस्या कल्पनाताई वैभवकुमार काळे, नगदवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख वनिता हांडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे,शाळा सल्लागार समिती अध्यक्ष सुरेश बढे,नगदवाडी विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष पोपटराव बढे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्या संगीता बढे,दिपाली जाधव,रघुनाथ बढे,दिनेश कुतळ, विकास बढे,दिनेश घाडगे,दयानंद बढे,संतोष बढे,बाबाजी बढे,संकेत कुतळ आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ,आशा आरेकर व उज्वला कांबळे या शिक्षकांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले तर आभार निलेश शेलार यांनी मानले.


COMMENTS