आजकालच्या जमान्यात लोक हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळे पदार्थ खातात तर काहीजण मखान्यांचा आहारात समावेश करतात. तब्येतीसाठी पौष्टीक असणारे मखाने...
आजकालच्या जमान्यात लोक हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळे पदार्थ खातात तर काहीजण मखान्यांचा आहारात समावेश करतात. तब्येतीसाठी पौष्टीक असणारे मखाने नैसर्गिकरित्या शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात.मखान्यांना पोषक तत्वांचे पॉवर हाऊस मानले जाते. मखाने खाल्ल्यानं कमकुवत हाडांना एनर्जी मिळते. जर तुम्ही दुधासोबत मखान्यांचे सेवन केले तर बरेच फायदे
मखान्यांना पोषक तत्वांचे पॉवर हाऊस मानले जाते. मखाने खाल्ल्यानं कमकुवत हाडांना एनर्जी मिळते. जर तुम्ही दुधासोबत मखान्यांचे सेवन केले तर बरेच फायदे मिळतील.
रोज मखाने खाल्ल्यानं शरीराला काय फायदे
१) हाडं मजबूत राहतात
जर तुम्ही दुधासोबत मखाने मिसळून खाल्ले तर हाडं तर मजबूत होतात पण कॅल्शियम, फॉस्फरस यांसारखे पदार्थही मिळतात. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यानं हाडं आणि दातं मजबूत होण्यासही मदत होते.
२) चांगली झोप येते
जर तुम्हाला झोप न येण्याचा त्रास असेल तर तुम्हाला टेंशन घेण्याची गरज नाही. रात्री झोपण्याआधी ग्लासभर दुधात मखाने घालून प्यायल्यानं मेंदू शांत राहण्यास मदत होते आणि झोपही चांगली लागते.
३) वजन कमी होतं
जर तुम्ही वाढत्या वजनानं त्रस्त असाल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी रोज १ ग्लास दुधासोबत मखाणे खाऊ शकता. मखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं.
४) शरीराला भरपूर एनर्जी मिळते
जर तुम्हाला आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मखाने आणि दूध हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. यामुळे ताकद मिळतेच पण शरीराला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि हेल्दी न्युट्रिएंट्ंस मिळतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
५) पचनक्रिया चांगली राहते
जर तुम्ही रोज दुधासोबत मखाने खाल्ले तर पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत.
मखान्यांच्या दूध तयार करण्याची योग्य पद्धत
सगळ्यात आधी एका भांड्यात तूप घाला. तूपात मखाने घालून ४ ते ५ मिनिटं भाजून घ्या. भाजलेले मखाने थोड्या वेळासाठी थंड करायला ठेवा. थंड झाल्यानंतर मखाने मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करून घ्या. नंतर एका भांड्यात २ कप दूध गरम करून आच मंद ठेवा. उकळत्या दूधात मखान्यांची पावडर घालून त्यात मखाने आणि बारीक केलेले काजू-बदाम घाला. दूध मंद आचेवर ४ ते ५ मिनिटं उकळू द्या. यात तुम्ही वेलची पावडर घालू शकता नंतर गॅस बंद करा. कोमट झाल्यानंतर या दुधाचे सेवन करा.


COMMENTS