ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एका व्यक्तीवर बाथरूमच्या खिडकीतून दोन महिलांचे गुपचूपपणे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक आरोप कर...
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एका व्यक्तीवर बाथरूमच्या खिडकीतून दोन महिलांचे गुपचूपपणे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. पोलिसांनी एफआरआय दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.मात्र, आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 8 जून रोजी रात्री उशिरा सारंग गावातील एका बंगल्यात घडल्याचं वृत्त आहे. घरात उपस्थित असलेल्या एका 16 वर्षीय मुलीने संशयित आरोपीने व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे लक्षात आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. नंतर पीडितेनं पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केलीबाथरूममधील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले
तक्रारीनुसार, त्याच परिसरात राहणाऱ्या आरोपीने, आपला मोबाईल फोन बाथरूमच्या खिडकीला काठीचा आधार घेत टेकवून उभा केला आणि किशोरवयीन मुलीची आई आणि मावशीचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला.
आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल केला. शिवाय तक्रारदार ही अल्पवयीन असल्याने आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलापोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला आहे. आऱोपीच्या शोधमोहिमेसाठी तपास करणे सुरू आहे, अद्याप आरोपी अटकेत नाही. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळतील आणि प्रकरणाची पुढील कारवाई होईल. आहे..


COMMENTS