पुणे : शहरासह उपनगरात दुपारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला. सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपस...
पुणे : शहरासह उपनगरात दुपारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला. सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी भागांत पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली.अनेकांनी पावसात भिजण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला आडोशामध्ये थांबणे पसंत केले. शहरात मागील काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. दररोज फक्त ढगाळ वातावरण आणि ऊन येत होते. अखेरव पावसाला सुरुवात झाली. अशा वातावरणामुळे पावसाळा सुरु झाल्यासारखे पुणेकरांना वाटू लागले आहे.
मागील आठवड्यात एकदा पावसाने झलक दिली होती. त्यानंतर फक्त ढगाळ वातावरण दिसून येत होते. पावसाने बराच काळ विश्रांती घेतली. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उकाड्यातही वाढ झाली होती. दुपारनंतर शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या सरी पडण्यास सुरुवात झाली आता जोरदार पाऊस सुरु झाला आहे. आज दुपारपर्यंत उकाडा जाणवत होता. त्यानंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली.
दरम्यान, हवामान विभागाने मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याआधीच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी स्वरूपाच्या सरी सुरू झाल्या असून पुण्यातही त्याचा अनुभव नागरिकांना आला.
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. साधारणपणे १०० टक्क्यांहून अधिक पावसाचा अंदाज असतो, मात्र यावर्षी राज्यात ९० ते ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुण्यात झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून आगामी काही दिवसांत हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


COMMENTS