Nagpur Crime : नागपूर येथील नंदनवन पोलीस ठाणे परिसरात लाज आणणारा प्रकार उघडकीस आला. सावत्र बापाने 8 वर्षीय पीडित मुलीशी अश्लील वर्तन केल्य...
Nagpur Crime : नागपूर येथील नंदनवन पोलीस ठाणे परिसरात लाज आणणारा प्रकार उघडकीस आला. सावत्र बापाने 8 वर्षीय पीडित मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आलं. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याला तुरूंगात टाकण्यात आले.संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
सावत्र बापाने मुलीवर जबरदस्ती केली
हा धक्कादायक प्रकार 5 जून रोजी रात्री नंदनवन पोलीस ठाणे परिसरातून उघडकीस आला. पीडितेच्या आईने नंदनवन पोलीस ठाणे गाठत प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दाखल केली. फिर्यादी आईच्या पहिल्या नवऱ्याची 2011 मध्ये मृत्यू झाला होता, यानंतर 2016 मध्ये आरोपीशी दुसरा विवाह केला. फिर्यादीला पाहिल्या नवऱ्यापासून दोन मुली आहेत. त्यापैकी एकीवर आरोपीने जबरदस्ती केली.
सावत्र बाप मुलीला कपडे उतरवायला सांगायचा आणि...
आरोपी सावत्र बाप हा दारूच्या नशेत असताना त्याने लहान मुलीसोबत घाणेरडं कृत्य केलं. फिर्यादीने पोलिसांना सांगितलं की, आरोपी मुलींना गोळ्या द्यायचा, नंतर कपडे उतरवायला सांगायचा आणि अश्लील कृत्य करायचा. यादरम्यान सावत्र बापाने मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं.
पीडित आईने तात्काळणे नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल होत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दखल केला, नंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


COMMENTS