Crime News : वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने तरुणाने मित्राच्याच मुलीला हॉटेलवर नेत लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीचं वय वर्षे 7 होते. आरोप...
Crime News : वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने तरुणाने मित्राच्याच मुलीला हॉटेलवर नेत लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीचं वय वर्षे 7 होते. आरोपीला पोलिसांनी जेव्हा घेरलं तेव्हा मुलीला तिच्या घरात सोडून पळ काढला.पोलिसांनी शोध घेताना त्याचा पाठलाग केला होता. आरोपीने नंतर पोलिसांवर गोळीबार केला. गोळीबारानंतर प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील गोळीबार केला, ज्यात त्याच्या पायाला गोळी लागली, संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये घडला.
हे प्रकरण गोरखपूरच्या गोला बाजारामधील हरपूर गावातील रहिवासी असलेल्या संजय मिश्रा सध्या टिळक नगरमधील लाकून गिरणीजवळच्या मंदिर रस्त्यावरील एका भाडेतत्त्वाच्या घरात राहत होता. तो एका कंपनीत काम करतो आणि त्याच्यासोबत आणखी एक कर्मचारी राहतो.
दोघेही एकमेकांचे अगदी घनिष्ठ मित्र बनले होते आणि एकमेकांच्या घरी जाऊ लागले होते. संजयच्या मित्राच्या सात वर्षीय मुलीला डोळ्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा संजय मिश्राने त्याला सांगितलं की, चित्रकूटमध्ये उपचारासाठी उत्तम डॉक्टर आहे. तो स्वत: तिकडे जाणार होता आणि मुलीवर उपचार करून घेणार होता. त्याच्यावर विश्वास ठेवत मित्राने आपल्या मुलीला त्याच्यासोबत पाठवले.


COMMENTS