मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींची घरं म्हणजे की अमिताभ बच्चन यांचा जलसा, शाहरूख खानचा मन्नत, सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंट... ही कित्येकांसाठ...
मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींची घरं म्हणजे की अमिताभ बच्चन यांचा जलसा, शाहरूख खानचा मन्नत, सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंट... ही कित्येकांसाठी पर्यटन स्थळंच. म्हणजे सेलिब्रिटींच्या या घराबाहेर जाऊन लोक फोटो काढतात.पण आता सलमान खान मुंबईत आणखी एक नवीन घर बांधतो आहे. आईच्या जागेवर भाईजानचा बंगला उभा राहणार आहे.
सलमानचं घर म्हटलं की गॅलेक्सी अपार्टमेंट समोर येतं. जे वांद्र्यात आहे. सलमान 1974 पासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे. पण आता सलमान वांद्र्यात आणखी एक घर बांधतो आहे. आपल्या कुटुंबासाठी बांद्र्यामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर एक नवीन 6 मजली घर बांधणार आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) ने 16 जून रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. बीएमसीने (BMC) यासाठी ऑक्टोबर 2025 मध्ये प्राथमिक परवानगी (IOD) जारी केली होती.
MCZMA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन घर सलमान खानची आई सलमा खान यांच्या जमिनीवर बांधलं जाईल. या प्लॉटवर पूर्वी 1956 पूर्वीचं एक दुमजली घर होतं, जे अत्यंत जर्जर अवस्थेत होतं. खान कुटुंबाने ते खरेदी केल्यानंतर पाडून टाकलं होतं.
असं असेल सलमानचं नवं घर
या प्रोजेक्टचं बांधकाम 'सच डेव्हलपर्स' कडून केलं जाईल. बांधकाम सुरू असताना एकही झाड तोडलं जाणार नाही, असं सांगण्यात आलं आहे. त्याऐवजी परिसर आणि आजूबाजूच्या भागात स्थानिक प्रजातींची नवीन झाडे लावली जातील.
नवीन इमारत तळमजला (Ground Floor), स्टिल्ट पार्किंग आणि 6 मजल्यांची असेल. याचं एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे 1014 चौरस मीटर असेल. त्यामुळे एकंदर पाहता सलमानचं हे घर शाहरूख खानच्या मन्नतला टक्कर देणारं असेल असंच वाटतं आहे.
कुठे असणार सलमानचं नवीन घर?
सलमान खानचं नवीन घर मुख्य रस्त्यापासून दूर एका शांत गल्लीत असेल. सध्याचं निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटपासून काही अंतरावरच बांद्र्यातील चिंबई भागात बांधलं जाईल.
2024 मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्याला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच, ज्या बाल्कनीतून तो आपल्या चाहत्यांना अभिवादन करायचा, ती बाल्कनी बुलेटप्रूफ काचेने सुरक्षित करण्यात आली आहे. आता हे घर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षा आणि प्रायव्हेसी प्रदान करेल.
याबाबत अद्याप सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. नवीन घर बांधल्यानंतर सलमान गॅलेक्सी सोडणार का? त्याचं काय करणार याबाबतही माहिती नाही.


COMMENTS