बँक मॅनेजर अन् आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, 6 वर्षांच्या मुलाचं पुढं काय झालं? | CrimeNama
Loading ...

बँक मॅनेजर अन् आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, 6 वर्षांच्या मुलाचं पुढं काय झालं?

Crime news: एका बँकेच्या एरिया मॅनेजरने आपल्या प्रेमसंबंधाचे गुपित उघड होऊ नये यासाठी प्रेयसीच्या 6 वर्षांच्या मुलाची गळा चिरुन हत्या केली. ...



Crime news: एका बँकेच्या एरिया मॅनेजरने आपल्या प्रेमसंबंधाचे गुपित उघड होऊ नये यासाठी प्रेयसीच्या 6 वर्षांच्या मुलाची गळा चिरुन हत्या केली. अंगदवीर असे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी (14 जून) त्याने आपल्या आईला आणि तिच्या प्रियकराला घरात एकत्र पाहिले होते.हा मुलगा आपल्या वडिलांना किंवा आजीला सर्व काही सांगेल, अशी भीती आरोपीला वाटत होती. याच कारणावरून मंगळवारी आरोपीने अंगदवीरला घड्याळ देण्याचे आमिष दाखवून आपल्या वॅगनआर कारमधून पळवून नेले आणि त्याची हत्या केली. अर्पित पराशर असे आरोपीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील ही घटना आहे.


लग्न समारंभातून अटक


अंगदवीर घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याची आजी बलजिंदर कौर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अर्पित हा लहान मुलाला कारमध्ये घेऊन जाताना स्पष्ट दिसला. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवून आरोपी अर्पितला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, या क्रूर हत्याकांढानंतर आरोपी अत्यंत निर्लज्जपणे आपल्या पत्नीसोबत गावातील एका लग्न समारंभात सामील झाला होता. विशेष म्हणजे त्याचे लग्न अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच झाल्याची माहितीही समोर आली आहे.शिर्डी : 'गद्दाराला साईबाबा किडे पाडून मारतील..' वाकचौरेंच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक पेटले


पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न


अटकेत असलेल्या आरोपी अर्पितची पोलिसांनी तब्बल आठ तास चौकशी केली. या आठ तासांच्या चौकशीत तो पोलिसांना खोटं सांगत राहिला. त्याने सुरुवातीला मुलाचा मृतदेह कालव्यात फेकल्याचा दावा केला, ज्यामुळे पोलीस आणि एसडीआरएफचे पथक दिवसभर कालव्यात शोध घेत राहिले. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तो पुरता कोलमडला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने पोलिसांना सांगितले की, तो अंगदवीरला 24 किलोमीटर दूर हस्तिनापूरच्या भद्रकाली मंदिराजवळील जंगलात घेऊन गेला होता. तिथे मुलाने आरडाओरडा करू नये म्हणून त्याने मुलाच्याच पगडीने त्याचे तोंड दाबले, त्यानंतर चाकूने आधी त्याच्या हाताची नस कापली आणि नंतर गळा चिरून त्याची हत्या केली.


आईचाही सहभाग असल्याचा संशय


पोलिसांनी बुधवारी (17 जून) संध्याकाळी आरोपीने दिलेल्या माहितीनुसार जंगलातील झुडपातून अंगदवीरचा मृतदेह जप्त केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि वॅगनआर कार जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी पंकज लवानिया यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार अर्पितने एकट्यानेच हा गुन्हा केला आहे, मात्र या संपूर्ण कटात मृत मुलाची आई गुरप्रीत कौर हिचाही सहभाग असल्याचा संशय आहे. पोलीस सध्या गुरप्रीतची कसून चौकशी करत असून, मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4846,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1776,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,969,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2147,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,754,Politics.,7,Pune,2070,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: बँक मॅनेजर अन् आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, 6 वर्षांच्या मुलाचं पुढं काय झालं?
बँक मॅनेजर अन् आईला नको त्या अवस्थेत पाहिलं, 6 वर्षांच्या मुलाचं पुढं काय झालं?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEhW-qkDeEpSSlmk4XNEbWkYLQ7xJgSsZZEIk_mdnt-dk4HIE9RSd-Ax2H5GGmU12Fnhqnyncl6Zy80__w7_gTEtF52F1nqa1nMoeQw17KXp0l1p8GhzWoLn8S3hhYhkS6KMb9VD0qefjAA-dxkWK3ER9q1575Rg4lHtw-EG1ro5L5Dk6N1i2Zb7slwyU/s320/n7164828001781799372273a616331ae7dc27dd67a6304f860b27e446a216c39e951f7c12f8545af37bd00d.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgEhW-qkDeEpSSlmk4XNEbWkYLQ7xJgSsZZEIk_mdnt-dk4HIE9RSd-Ax2H5GGmU12Fnhqnyncl6Zy80__w7_gTEtF52F1nqa1nMoeQw17KXp0l1p8GhzWoLn8S3hhYhkS6KMb9VD0qefjAA-dxkWK3ER9q1575Rg4lHtw-EG1ro5L5Dk6N1i2Zb7slwyU/s72-c/n7164828001781799372273a616331ae7dc27dd67a6304f860b27e446a216c39e951f7c12f8545af37bd00d.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/6_01994593924.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/6_01994593924.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content