Crime News : गुजरातच्या राजकोटमधील उपलोटा येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली. एका सरकारी शाळेतील शिक्षकाने सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपी शिक्षक...
Crime News : गुजरातच्या राजकोटमधील उपलोटा येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली. एका सरकारी शाळेतील शिक्षकाने सर्व मर्यादा ओलांडल्या. आरोपी शिक्षकाने तब्बल 5 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केला.या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीची ओळख देवानंद गोवाभाई बोरा असल्याचे सांगण्यात येते.
शिक्षकाने 5 विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
क्रूरतेच्या बळी पडलेल्या पाच निष्पाप विद्यार्थिनींचं वय वर्षे सहा ते सात दरम्यान असल्याचे सांगण्यात येते. आरोपीची देवानंद बेरा अशी ओळख असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली. संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तात्काळपणे पोलीस कारवाई केली. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पटनवाव पोलीस ठाण्याच्या पथकाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि या प्रकरणाची शोधमोहिम केसंबंधित घटनेबाबत मुलींच्या कुटुंबीयांचीही करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. याच घटनेनं पीडित कुटुंबीयांनाच नाही,तर स्थानिकांना देखील मोठा धक्का बसला आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी करण्यात आली आहे.आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी शिक्षकाविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला. जखमी झालेल्या पीडित विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.


COMMENTS