अनैतिक संबंधाला चटावलेल्या बायकोने 54 वर्षाच्या नवऱ्याला संपवलं, तेही भलत्याच पद्धतीने... | CrimeNama
Loading ...

अनैतिक संबंधाला चटावलेल्या बायकोने 54 वर्षाच्या नवऱ्याला संपवलं, तेही भलत्याच पद्धतीने...

 कराड: मुंबईहून घरी परतणारा एक सरकारी अभियंता, पहाटेची वेळ.. निर्जन रस्ता आणि काही क्षणांत झालेला एक भीषण अपघात. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं...


 कराड: मुंबईहून घरी परतणारा एक सरकारी अभियंता, पहाटेची वेळ.. निर्जन रस्ता आणि काही क्षणांत झालेला एक भीषण अपघात. सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलं, ही एक दुर्दैवी दुर्घटना आहे. पण पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं, मोबाइल लोकेशन बघितलं आणि एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर येऊ लागले.या तपासाने उघड केला एक असा कट ज्याने सगळेच हादरून गेले. कारण या कटात सामील होते ते म्हणजे त्या व्यक्तीची बायको आणि तिचा प्रियकर... अत्यंत थंड डोक्याने पतीच्या हत्येसाठी रचलेला कट जेव्हा समोर आला तेव्हा सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला.



नेमकी घटना काय?


कराडमधील अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या मृत्यूमागचा थरार नुकताच उघडकीस आला आहे. 54 वर्षीय लक्ष्मण श्रीरंग मंडले हे जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 6 जूनच्या पहाटे ते मुंबईहून कराडमध्ये परतले होते. सकाळी साधारण 5 वाजून 20 मिनिटांनी ते ट्रॅव्हल्स बसमधून उतरले आणि घराच्या दिशेने निघाले. पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या प्रत्येक हालचालीवर कोणाची तरी नजर आहे.


दरम्यान, सुपर मार्केट परिसरात ते पोहोचताच मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अल्टो कारने त्यांना जोरदार धडक दिली. क्षणात सर्व काही संपलं, लक्ष्मण मंडले यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा एक केवळ अपघात वाटत होता. पण तपास सुरू झाल्यानंतर काही गोष्टी पोलिसांच्या नजरेत खटकू लागल्या. मग सुरू झाला तांत्रिक तपास.


CCTV फुटेज, मोबाइल लोकेशन, फॉरेन्सिक पुरावे आणि डिजिटल ट्रेल... या सगळ्यांचा माग घेत पोलीस एका अशा सत्यापर्यंत पोहोचले, ज्याने संपूर्ण प्रकरणाचं स्वरूपच बदलून टाकलं. तपासात समोर आलं की, मृतकाची पत्नी सारिका मंडले हिचे 2023 पासून प्रथमेश थोरात नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. याच नात्यातून पुढे एका कटाचा जन्म झाला.


 

पोलिसांच्या माहितीनुसार लक्ष्मण मंडले यांना कायमचं मार्गातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सारिका मंडले, तिचा प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याच्या साथीदाराने मिळून संपूर्ण योजना आखली. तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. ही हत्या घडवून आणण्यासाठी खास एक अल्टो कार खरेदी करण्यात आली होती.


6 जूनच्या सकाळी आरोपींनी लक्ष्मण मंडले यांचं लोकेशन ट्रॅक केलं. ते कुठे आहेत... कोणत्या मार्गाने घरी जात आहेत. याची माहिती पत्नी सरितानं आरोपींना म्हणजेच या कॉन्ट्रॅक्ट किलरला दिली. योग्य क्षणाची वाट पाहून कोल्हापूर नाका, कमल हॉस्पिटलसमोर कारने त्यांना मागून धडक दिली. पण ही फक्त धडक नव्हती, तपासात समोर आलं की पहिल्या धडकेनंतरही लक्ष्मण मंडले जिवंत असल्याचा संशय आरोपींना होता आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा कार त्यांच्या अंगावर घातली. त्यानंतर आरोपीनं खाली उतरून लक्ष्मण यांची बॅग घेतली आणि फोनही घेतला.


कोणताही पुरावा राहू नये, कोणतीही शक्यता उरू नये यासाठी हा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या संपूर्ण कटासाठी तीन लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे. पण एकूण व्यवहार किती रुपयांचा होता, याचा तपास अजून सुरू आहे.


तपासाची चक्रं वेगाने फिरू लागली. सर्वात आधी पोलिसांनी सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना ताब्यात घेतलं. तपासात महिलेनं सांगितलं की नवरा त्रास देत होता त्यामुळे माझे प्रमसंबंध होते आणि म्हणूनच तिने हत्येचा कट रचला. यानंतर तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश अशोक होनसुरे यांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणाबाबत डीवायएसपी राजश्री पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.


एका अपघातासारखी दिसणारी घटना ही प्रत्यक्षात एक पूर्वनियोजित हत्या निघाली. प्रेमसंबंध, कटकारस्थान, सुपारी आणि अपघाताचा मुखवटा या सगळ्यामुळे कराडमधील हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरलं आहे. आता या कटामागील प्रत्येक धागा पोलीस उलगडत आहेत. तपास जसजसा पुढे सरकेल तसतसे या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक पैलू समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: अनैतिक संबंधाला चटावलेल्या बायकोने 54 वर्षाच्या नवऱ्याला संपवलं, तेही भलत्याच पद्धतीने...
अनैतिक संबंधाला चटावलेल्या बायकोने 54 वर्षाच्या नवऱ्याला संपवलं, तेही भलत्याच पद्धतीने...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifBzRJiedj2lOLwkAPelV2x4bXTjGMXpzcKDbv5-cD0okZaPsBZHuFBEkaIDmOP01n26rDuNP3MbQsphgG_vy0AvLJjiTagRzzOvL35hJQag-zeA-wA0pSYvtw9jJJ8FWjQ17_q2WRosino1kjjx2P35Sz4GLvj10TWpB42fZkMELrUvzaAKyduuAEGQI/s320/n7154698351781068790326fc1d0b2eac7e70f7c3ca52b2e1b006f7714d044eba02c33a8915b15939bac052.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifBzRJiedj2lOLwkAPelV2x4bXTjGMXpzcKDbv5-cD0okZaPsBZHuFBEkaIDmOP01n26rDuNP3MbQsphgG_vy0AvLJjiTagRzzOvL35hJQag-zeA-wA0pSYvtw9jJJ8FWjQ17_q2WRosino1kjjx2P35Sz4GLvj10TWpB42fZkMELrUvzaAKyduuAEGQI/s72-c/n7154698351781068790326fc1d0b2eac7e70f7c3ca52b2e1b006f7714d044eba02c33a8915b15939bac052.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/54.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/54.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content