जेवणाची चव वाढेल आणि शरीरही राहील थंड, फक्त घरी लावा 'ही' 4 हर्ब्स वनस्पती | CrimeNama
Loading ...

जेवणाची चव वाढेल आणि शरीरही राहील थंड, फक्त घरी लावा 'ही' 4 हर्ब्स वनस्पती

  आजच्या धावपळीच्या जीवनात आपण प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या हेल्दी पदार्थांचे तसेच इतर निरोगी गोष्टी...

 



आजच्या धावपळीच्या जीवनात आपण प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या हेल्दी पदार्थांचे तसेच इतर निरोगी गोष्टी खरेदी करतो. मात्र बाजारात मिळणारी प्रत्येक गोष्ट हेल्दी असेल याची खात्री नसते, कारण प्रत्येक गोष्टीत कोणत्या ना कोणत्या प्रकारची भेसळ केलेली असते.

पण तुम्ही यावर मात म्हणून घरच्या घरी अगदी छोट्याशा जागेत सुद्धा भाज्या आणि औषधी वनस्पतींची सहजपणे लागवड करू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे. कारण सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या भाज्या, औषधी वनस्पती ज्या तुमच्या शरीराला थंडावा देतील आणि उन्हाळ्यात मळमळ आणि पोटदुखी यांसारख्या आरोग्य समस्या टाळण्यास मदत करतील.


तर तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत गवती चहा, पुदिना आणि कढीपत्ता अशा औषधी वनस्पती सहज लागवड करू शकता, ज्या पोषक तत्वांचा खजिना आहेत. चला, या औषधी वनस्पतींचा आपल्या आहारात समावेश कसा करायचा आणि त्यामध्ये किती पोषक तत्वे असतात हे जाणून घेऊयात. औषधी वनस्पती घरी लागवड करणे खूप सोपे आहे कारण त्यांची वाढ झपाट्याने होते. उन्हाळ्यात त्यांना फक्त उन्हापासून थोडे संरक्षण देण्याची गरज असते. या सर्व औषधी वनस्पती शरीर थंड ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहेत.


पुदिना सहज लागवड करता येते


उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी पुदिना ही एक उत्तम औषधी वनस्पती आहे. हेल्थलाइननुसार , ज्यांना आयबीएस म्हणजेच पचनाची समस्या आहे त्यांच्यासाठी पुदिन्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. तसेच आम्लपित्त, छातीत जळजळ, गॅस आणि मळमळ व उलट्या यांसारख्या अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. कारण पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन ए, फायबर, लोह, फोलेट आणि मॅंगनीज यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात.


गवती चहाची लागवड


गवतीचहाला लिंबासारखा सुगंध असतो. त्यामुळे याचा वापर चहा मध्ये अनेकदा केला जातो. गवतीचहाच्या चहा प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि ताजेपणा जाणवतो. यापासून बनवलेला चहा उन्हाळ्यातील ताण कमी करण्यास मदत करू शकतो. गवतीचहामध्ये क्लोरोजेनिक ॲसिड, आयसोओरिएंटिन आणि स्वर्टियाझापोनिन यांसारखे अनेक पॉवरफूल अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. हे घटक उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.


हिरव्या कोथिंबिरीचा थंडावा देणारा गुणधर्म


कोथिंबीर शरीराला थंडावा देणारी एक उत्तम औषधी वनस्पती आहे. ती पचनक्रिया सुधारते आणि गॅस व पोट फुगणे या समस्येपासून आराम मिळतो. तुम्ही कोथिंबिरीच्या पानांचा रस किंवा काढा देखील पिऊ शकता. तुमच्या घरी आधीपासून असलेल्या सुकलेल्या कोथिंबिरीच्या बियांपासून तुम्ही कोथिंबिर सहजपणे लागवड करू शकता.


कढीपत्ता ही एक अद्भुत औषधी वनस्पती आहे


एखाद्या पदार्थात कढीपत्त्याच्या पानांची फोडणी दिल्याने जेवणाची चव खूपच चविष्ट लागते. तसेच कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास प्रभावी ठरते. तुम्ही रिकाम्या पोटी कढीपत्ता चावू शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि सूज कमी करण्यास प्रभावी ठरते. हेल्थलाइनच्या मते , संशोधनातून असे दिसून आले आहे की कढीपत्त्यामध्ये लिनॅलूल, अल्फा-टर्पिनिन, मायर्सीन आणि अल्फा-पिनिन यांसारखे अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात.


( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


🧘 आरोग्य & लाइफ स्टाइल

COMMENTS

Name

Agriculture,83,Ahmednagar,86,Amaravati,19,Aurangabad,39,Breakin,1,Breaking,4334,Buldhana,17,Chandrapur,2,Cooking,4,Crime,1600,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,73,Gadchiroli,5,Health,469,India,813,Jalgaon,33,Jalna,19,Kolhapur,27,Lifestyle,347,Maharashtra,1841,Mumbai,451,Nagpur,57,Nashik,73,Politics,646,Pune,1962,Raigad,27,Ratnagiri,20,Sangali,36,Satara,50,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,67,Technology,39,World,76,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: जेवणाची चव वाढेल आणि शरीरही राहील थंड, फक्त घरी लावा 'ही' 4 हर्ब्स वनस्पती
जेवणाची चव वाढेल आणि शरीरही राहील थंड, फक्त घरी लावा 'ही' 4 हर्ब्स वनस्पती
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiL10tFN9vB1homq9xH3HTAdwUqt0Bg-azB93Dgu1soZWR-3yIumDdPtXlZ1fCEEmNgc2te_hlhGn8zAx4hSNnB1__GWtHf2NoNfjwvQz3V0zvgsBE5BUypxWXFqCs9St1xctAbKpvwv1ijREMrjD0OmrF7AcxK-XFyRwtbvF9xCflfBcY5RBgEjhNii7o/s320/n7145720961780461567211816c730150cfa1a73347c7b65adff4642fa6f72cde3220bbb0aba7dec0e77554.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiL10tFN9vB1homq9xH3HTAdwUqt0Bg-azB93Dgu1soZWR-3yIumDdPtXlZ1fCEEmNgc2te_hlhGn8zAx4hSNnB1__GWtHf2NoNfjwvQz3V0zvgsBE5BUypxWXFqCs9St1xctAbKpvwv1ijREMrjD0OmrF7AcxK-XFyRwtbvF9xCflfBcY5RBgEjhNii7o/s72-c/n7145720961780461567211816c730150cfa1a73347c7b65adff4642fa6f72cde3220bbb0aba7dec0e77554.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/4.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/4.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content