पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायका प्रकार उघडकीस आला आहे. शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरात 3 वर्षीय निष्पाप मुलाची निर्...
पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायका प्रकार उघडकीस आला आहे. शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरात 3 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.या घटनेनं परिसर हादरून गेला होता. धक्कादायक बाब अशी की, आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणाने जीव घेतला आहे. ते तिघेही रांजणगाव परिसरातच राहत होते.आरोपी तरुणाची देवांशी साहू अशी ओळख पटली.
चिमुरड्यावर दारूच्या नशेत हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीकडून महिलेवर मुलाला त्याच्या वडिलांकडे सोडून येण्यास तरुणाकडून दबाव टाकण्यात आला होता. यावरून मोठा वाद देखील उफळल्याची माहिती समोर आली. महिला एका कंपनीत उदरनिर्वाहासाठी काम करत होती. ती कंपनीत गेल्यानंतर घरात एकट्या असलेल्या चिमुरड्यावर आरोपीनं दारूच्या नशेत हल्ला करून त्याची हत्या केली. या प्रकरणाचा पोलीस तपास घेत आहेत.दरम्यान, ज्या दिवशी हा धक्कादायक प्रकार घडला तेव्हा परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेनं नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपी देवांशी साहूला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली. तसेच पोलीस त्याची चौकशी करत पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुण्यात विवाहबाह्य संबंधांत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. तसेच घटस्फोटाच्या प्रमाणात देखील वाढ होऊ लागली आहे, अशा घटना सातत्याने घडत असल्याने सुखाचे संसार उद्ध्वस्त होताना दिसतात.


COMMENTS