सांगलीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील काही कॅफेची चौकशी करण्यात आली. कॅफेत प्रति तास 300 ते 800 रुपये देऊन भाड्याने खाजगी ...
सांगलीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील काही कॅफेची चौकशी करण्यात आली. कॅफेत प्रति तास 300 ते 800 रुपये देऊन भाड्याने खाजगी केबिन उपलब्ध करून दिले जात असल्याचा आरोप आहे.एका संस्थेनं दावा केला की, कॅफेत पोहोचल्यावर कचरापेटीत कंडोम आणि गोळ्या आढळल्या. विश्रामबाग पोलीस ठाण्यात एका तरुणीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आला.
प्रति तास 300 ते 800 रुपये आकारले जातात
या तक्रारीनंतर, स्थानिक संघटना, शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने शहरातील काही कॅफेंबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. संस्थेचा दावा असा की, शहरातील कॅफे हे बऱ्याच काळापासून केवळ चहा आणि कॉफीपुरते मर्यादीत न राहता त्यातून इतर नको त्याच सेवा दिल्या गेल्या. तरुण जोडप्यांसाठी पडदे आणि विभाजन असलेल्या खाजगी केबिन उपलब्ध करून दिल्या होत्या, असा आरोप करण्यात आला. या केबिनसाठी प्रति तास 300 ते 800 रुपये आकारले जात होते, असेही वृत्त आहे.
कचरापेट्यामध्ये वापरलेले कंडोम आणि..
या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून कॅफेत तपासणी केली होती. त्यांच्या दाव्यानुसार, अनेक कचरापेट्यामध्ये वापरलेले कंडोम आणि गर्भनिरोध गोळ्या देखील आढळल्या होत्या. या दाव्यामुळे शहरातील कॅफे संस्कृती आणि तिच्या देखरेखीबाबत एक वादविवाद सुरू झाला होता. संघटनेच्या म्हणण्यांनुसार, काही कॅफेत कॅमेरे अशा कोनात लावण्यात आला होता, ज्याचा वापर ग्राहकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी गेला जातो.
काही व्यक्तींनी मोबाईल फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपांना अद्यापही दुजोरा मिळालेला नाही. तपास यंत्रणा सध्या सर्व बाबींची चौकशी करत आहे. याच संघटनेनं याआधी देखील कॅफेच्या विषयावरून शहरात आवाज उठवला होता. संघटनेचं म्हणणं असं की, हा मुद्दा प्रशासनाकडे अनेकदा मांडला आहे. संघटनेनं मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील भेट
घेतली होती.
दरम्यान, या कारवायांवर तात्पुरती का होईना बंदी घालण्यात आली होती, मात्र पुन्हा अशी प्रकरण होऊ लागलीत. लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर, याच संघटनेनं एक मोहिम सुरू केली होती. कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या, नंतर पाहणी करत पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या. अशातच शहरातील कॅफे संस्कृतीबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते.


COMMENTS