वहिनीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, शेवटी नदीत सापडला 19 वर्षीय मुलीचा मृतदेह | CrimeNama
Loading ...

वहिनीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, शेवटी नदीत सापडला 19 वर्षीय मुलीचा मृतदेह

Crime : एका 19 वर्षीय तरुणीची तिच्या भावाने आणि वहिणीने निर्घृण हत्या केली आहे. वहिनीचे आपल्याच दिरासोबत असलेले अनैतिक संबंध नणंदेने प्रत्यक...



Crime : एका 19 वर्षीय तरुणीची तिच्या भावाने आणि वहिणीने निर्घृण हत्या केली आहे. वहिनीचे आपल्याच दिरासोबत असलेले अनैतिक संबंध नणंदेने प्रत्यक्ष पाहिल्याने, बदनामीच्या भीतीने भाऊ आणि वहिनीने मिळून तिचा खून केला.


 एवढेच नव्हे तर, या गुन्ह्यात मुलीच्या वडिलांनी आणि एका नातेवाईकाने मदत करत मृतदेह कारमधून नेऊन एका नदीत फेकून दिला होता. याप्रकरणी आरोपी वहिनीला अटक केली असून, फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. ज्योती असे मृत तरुणीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरातील ही घटना आहे.


नदीत आढळला मृतदेह


मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय ज्योती 6 जूनच्या सकाळपासून अचानक बेपत्ता झाली होती. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती. दरम्यान, 8 जून रोजी एका नदीत अनोळखी मृतदेह आढळून आला. दोन दिवसांनंतर सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांनी या मृतदेहाची ओळख ज्योती म्हणून पटवली. ज्योती बेपत्ता असतानाही कुटुंबीयांनी ती आजारी होती आणि तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार केल्याची खोटी माहिती गावात पसरवली होती. परंतु, शवविच्छेदन अहवालात ज्योतीचा गळा आणि श्वास नलिकेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आल्यानंतर हत्येचा हा थरार उघडकीस दीर आणि वहिनी आक्षेपार्ह अवस्थेत


ज्योतीचे मामा राजेंद्र यांनी याप्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली. ज्योती नेहमी मामाजवळ भाऊ आणि वहिनीच्या संशयास्पद वागणुकीबद्दल बोलायची. पोलिसांच्या चौकशीत अटक करण्यात आलेली वहिनी रेखा हिने आपला गुन्हा कबूल केला आहे. रेखाचा पती वीरू हा मजुरीसाठी बाहेरगावी राहत असल्याने तिचे तिचा दीर मिलन याच्याशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते. 5 जूनच्या रात्री घरात कोणी नसताना रेखा आणि मिलन आक्षेपार्ह स्थितीत होते. याच वेळी नणंद ज्योतीने त्यांना रंगेहात पकडले आणि या कृत्याला तीव्र विरोध केला. आपले हे कृत्य उघड होऊन समाजात बदनामी होईल, या भीतीने रेखा आणि मिलन यांनी मिळून ज्योतीचा गळा चिरून तिचा गेम केला.


हत्या केल्यानंतर घाबरलेल्या दोन्ही आरोपींनी ज्योतीचे वडील मान सिंग यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर वडील मान सिंग, भाऊ मिलन, नातेवाईक सुनील आणि एका अज्ञात कार चालकाच्या मदतीने ज्योतीचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि हत्येसाठी वापरलेला चाकूही त्यात ठेवून कारमधून नेऊन नदीत फेकून दिला. 8 जून रोजी मृतदेह सापडल्याची बातमी समजताच सर्व आरोपी घरातून पसार झाले होते. आरोपी वहिनी रेखा आणि तिचा प्रियकर म्हणजेच ज्योतीचा भाऊ मिलन हे दोघे मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सापळा रचून रेखाला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल. 

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: वहिनीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, शेवटी नदीत सापडला 19 वर्षीय मुलीचा मृतदेह
वहिनीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, शेवटी नदीत सापडला 19 वर्षीय मुलीचा मृतदेह
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDlISl6AB1seNgRiA5282u7RUJpcZlQ7DlrqqbdRGMzwYeYf2EXH4otNHlxeiUbbENMk1E6XQSfDMtVVfMjnMQhzxhyphenhyphenSxW4hJVtbJf5cfSDveAR3c6KeWTX_CHNtLCakmHf-uy8EqEHLOiun7GS8Cgnf2qCuRgEL6AG3rNpsP4Q0WM8Oc-TenbVUPL-T0/s320/n71604058817814533321460fc178746486d1def24337de682f7ff47744934fd223bebddef8fd89b77bd8d7.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDlISl6AB1seNgRiA5282u7RUJpcZlQ7DlrqqbdRGMzwYeYf2EXH4otNHlxeiUbbENMk1E6XQSfDMtVVfMjnMQhzxhyphenhyphenSxW4hJVtbJf5cfSDveAR3c6KeWTX_CHNtLCakmHf-uy8EqEHLOiun7GS8Cgnf2qCuRgEL6AG3rNpsP4Q0WM8Oc-TenbVUPL-T0/s72-c/n71604058817814533321460fc178746486d1def24337de682f7ff47744934fd223bebddef8fd89b77bd8d7.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/19.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/19.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content