चोर काय चोरी करेल याचा नेम नाही, हल्ली रस्त्यावर मोबाईल, सोन साखळी चोरीचे प्रकार वाढत चालले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचा...
चोर काय चोरी करेल याचा नेम नाही, हल्ली रस्त्यावर मोबाईल, सोन साखळी चोरीचे प्रकार वाढत चालले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवर आलेल्या चोराने मोबाईल घेऊन पळ काढला, पण समोरून येणाऱ्या एका हमालाने डोक्यावर असलेलं पोतं चोरांच्या स्कुटीवर फेकून मारलं.त्यामुळे चोर खाली पडले. पण, घटनास्थळावरून पळ काढताना एका चोराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बंंगळुरूमधील कब्बनपेट भागामध्ये 16 जून रोजी संध्याकाळी ही घटना घडली. वकील असलेले बसवराजू एम हे रस्त्यावरून फोनमध्ये लोकेशन चेक करत होते. त्याचवेळी स्कुटीवरून दोन चोर पाठीमागून आले आणि बसवराजू यांच्या हातातून मोबाईल हिसका मारून पळ काढला. बसवराजू यांनी चोर चोर म्हणत आरडाओरडा करत पाठलाग केला.
पण, त्याचवेळी समोरून एक हमाल डोक्यावर एक पोतं घेऊन येत होता. चोरांनाा समोरून येताना पाहून या हमालाने डोक्यावरचं पोत स्कुटीवर फेकलं. पोतं थेट स्कुटीच्या हँडलवर आदळल्यामुळे दोन्ही चोर जागेवरच पडले. चोरी केलेला मोबाईल सुद्धा खाली पडला. आता आपण पकडलो जाणार म्हणून दोन्ही चोर स्कुटी तशीच सोडून पळाले. पण २५० मीटर दूर अंतरावर एक १८ वर्षांचा चोर जुनैद हा जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
हार्टअॅटकमुळे मृत्यू
स्थानिकांनी या तरुणाला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केलं. पण, १८ वर्षांच्या जुनैदचा हार्ट अॅटकने मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी त्याच्या २३ वर्षीय साथीदार तरुणाला अटक केली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी 'जागेवरच हिशेब झाला हा कर्मा आहे' असं म्हणत कमेंट केली. तर काही तरुणांनी चोरांच्या स्कुटीवर पोतं फेकून मारणाऱ्या हमालाचं कौतुक केलं आहे, या हमालाला राष्ट्रीय शौर्याचा पुरस्कार दिला पाहिजे, अशी मागणी केली.


COMMENTS