Jalna Crime : जालना जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परतूर तालुक्यात वडिलांच्या मित्राने एका 17 वर्षी...
Jalna Crime : जालना जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परतूर तालुक्यात वडिलांच्या मित्राने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या लज्जास्पद घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी नवनाथ सोपान आयंदेविरूद्ध गुन्हा दाखल केला. नराधमाने पीडितेला गर्भवती ठेवल्याची माहिती समोर आली.
चार महिन्यांपूर्वी पीडितेवर जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवले
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते, ती आपल्या पालकांना शेतीच्या कामात मदत करत होती. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र होता. तो सतत त्यांच्या घरी ये-जा करायचा. चार महिन्यांपूर्वी पीडित मुलगी शेतात काम करताना नराधमाने शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर आरोपीने जबरदस्ती केल्याचा आरोप पीडितेनं तक्रारीत नमूद केला आहे.
पीडिता चार महिन्यांची गर्भवती राहिली
आरोपी इथवरंच न थांबता त्याने वारंवार भीती दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. काही दिवसांतच पीडितेला उलट्या आणि पोट दुखू लागलं. त्यानंतर पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात पीडितेवर सोनोग्राफी करण्यात आली असता, ती पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली होती. पालकांनी पीडितेची विचारपूस केली असता, तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली.
संबंधित प्रकरणी 7 जून रोजी माजलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर हाच गुन्हा शून्य क्रमांकाने आष्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेनं परिसरातील नागरिकांनी संपात व्यक्त केला आहे.


COMMENTS