ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील धरूआडीच पोलीस ठाणे परिसरात मंगळवारी सायंकाळी अत्यंत दुःखद घटना घडली. तीन नराधमांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर ...
ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील धरूआडीच पोलीस ठाणे परिसरात मंगळवारी सायंकाळी अत्यंत दुःखद घटना घडली. तीन नराधमांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी ही तलावातून अंघोळ करून परतत असताना हा प्रकार घडला.
पीडितेचं वय 17 असल्याची माहिती समोर आली. आरोपींनी पीडितेला ताब्यात घेत निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
पीडित गंभीर जखमी
पीडितेवर केलेल्या या हल्ल्यात मुलगी गंभीरपणे जखमी झाली होती. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जेव्हा पीडित मुलगी शुद्धीत आली तेव्हा तिने हिंमतीने घरी येऊन कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
नराधमावर गुन्हा दाखल
तिला तात्काळपणे सायंकाळी 7 वाजता मुलीला आणि तिच्या आईला घेऊन पोलीस ठाण्यात नेत एफआरआय दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत भारतीय दंड संहिता कलम 70 (2), 77, 351 (2) आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस अधीक्षक अमृतपाल कौर यांनी पीडितेशी वैयक्तितरित्या संवाद साधला, घटनास्थळी भेट देखील देण्यात आली. पोलीस पथकांनी संयुक्तपणे शोधमोहिम राबविली. पोलिसांनी केलेल्या तपासातून सुमारे साडे नऊ वाजता तक्रार दाखल केली.
नंतर अवघ्या काहीच वेळात तळसारा गावानजीक आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळपणे पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. जिथे तिच्यावर वैद्यरकीय उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती गंभीर असून पोलिसांकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.


COMMENTS