वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एक 47 वर्षीय बाप गेल्या त...
वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एक 47 वर्षीय बाप गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता.
या नराधम बापाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर परिसरातील ही घटना आहे. काल (1 जून) सकाळी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी हा एका नामांकित कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असून, अवघ्या चार महिन्यांपूर्वीच तो येथे रुजू झाला होता. त्याच्या विरोधात त्याच्याच पत्नीने 31 मे रोजी दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले आणि पुढील कारवाईसाठी त्याला आपल्या ताब्यात घेऊन रवाना झाले.
'असं' बाहेर आलं प्रकरण
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. काही महिन्यांपूर्वी तिने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी दुर्गापूर येथील मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर एप्रिल महिन्यात तिची आई आणि वडील तिला पुढील उपचारासाठी वेल्लोर येथे घेऊन गेले. वेल्लोरमधील डॉक्टरांनी तपासणी दरम्यान मुलीची अवस्था पाहून संशय व्यक्त केला आणि तिला विश्वासात घेऊन प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा त्या मुलीने आपल्यावर बेतलेला हा भयानक प्रसंग डॉक्टरांना सांगितला, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
पीडित मुलीने डॉक्टरांना सांगितले की, तिचा बाप गेल्या तीन वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण करत होता. जेव्हा कधी तिने या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा 'तुझ्या आईला सोडून निघून जाईन', अशी धमकी बापाने तिला दिली होती. वडिलांनी आपल्यामुळे आईला सोडू नये आणि आईचा संसार सुखाचा राहावा, याच भीतीने ती निष्पाप मुलगी गेली तीन वर्षे हा सगळा नरक यातनांचा छळ मुकाट्याने सहन करत होती. मुलीचा हा जबाब ऐकून हादरलेल्या आईने वेळ न गमावता तात्काळ वेल्लोरमधूनच 'झिरो एफआयआर' (Zero FIR) दाखल केला आणि त्यानंतर 31 मे रोजी दुर्गापूर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध रीतसर गुन्हा नोंदवला.
बापाचा वेगळाच आरोप
सोमवारी (1 जून) दुर्गापूर पोलिसांनी दुमका नगर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपीला अटक केली. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपले पत्नीसोबतचे संबंध चांगले नसल्याचा दावा त्याने केला असून, आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे. पत्नीनेच मुलीचा आधार घेऊन एका रचलेल्या कटाचा भाग म्हणून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा अजब दावा आरोपी बापाने केला आहे. मात्र, पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरुद्ध कडक कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू केला आहे.


COMMENTS