Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका मशिदीत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच...
Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका मशिदीत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीची ओळख इमाम झाकीर हुसैन अशी आहे.दरम्यान पोलिसांच्या चकमकीत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पीडित मुलगी सोमवारी दुपारी उर्दू शिकण्यासाठी गेली असता, रामगढ मशिदीत हा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आपण कोंडीत सापडलो आहोत हे पाहून त्याने पिस्तुलने पथकावर गोळीबार केला. मात्र प्रत्युत्तर म्हणून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला असता, त्याच्या पायाला गोळी लागली, ज्यात तो जखमी झाला. त्याला एका शासकीय ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.


COMMENTS