सांगली: सांगली शहरातील अभयनगर परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार स...
सांगली: सांगली शहरातील अभयनगर परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि हमाल पंचायत पतपेढीचे सभापती बाळासाहेब बंडगर यांचा 13 वर्षीय नातू वेदांत बंडगर याची अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.या घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
13 वर्षीय वेदांतच्या डोळ्यातच घुसली गोळी
प्राथमिक माहितीनुसार, वेदांत बंडगर हा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मारुती बंडगर यांचा मुलगा होता. अभयनगर येथील राहत्या घरी असताना 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक घरावर धाड टाकली. त्यानंतर त्यांनी वेदांतवर गोळीबार केला. या गोळीबारातील एक गोळी वेदांतच्या उजव्या डोळ्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अल्पवयीन मुलावर झालेल्या या हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरात घुसून करण्यात आलेल्या या हल्ल्यामागे नेमका काय हेतू होता, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोघटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे जमा करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून हल्लेखोरांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली असून काही पथके जिल्ह्याबाहेरही रवाना करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आदरम्यान, एवढ्या लहान मुलाची घरात घुसून हत्या झाल्यामुळे सांगलीतील कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्येमागे वैयक्तिक वैर, आर्थिक वाद किंवा अन्य कोणता हेतू आहे का, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करत आहेत.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास संजयनगर पोलीस ठाण्याकडून सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.हेत.र आहे.


COMMENTS