अवघ्या एका मिनिटांच्या आत बसलेल्या दोन शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यामुळे व्हेनेझुएलात प्रचंड नुकसान झालंय. शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या, क...
अवघ्या एका मिनिटांच्या आत बसलेल्या दोन शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यामुळे व्हेनेझुएलात प्रचंड नुकसान झालंय. शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या, क्षणात पत्त्याच्याबंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या.भूकंपामुळे एअरपोर्टचेही बरेच नुकसान झालं आहे. राजधानी काराकसपासून ते व्हेनेझुएलातील वेगवेगळ्या शहरातील व्हिडीओ समोर आले असून त्यामधून अतिशय भयानक, भीतीदायक , विदारक चित्र दिसत आहे. या दुर्दैवी घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या (USGS) अंदाजानुसार, मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
या भयानक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असण्याची शक्यता आहे, असं यूएसजीएस (USGS) ने म्हटलं आहे. मृतांची संख्या 10 हजारांपासून ते आणखी पुढे असण्याचा अदांज वर्तवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप मृत किंवा जखमींची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही; मात्र स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्षदर्शींनी इमारती कोसळणे, बचावकार्य सुरू असणे आणि बळींची वाढती संख्या यांबाबत माहिती दिली आहे.
भूकंपामुळे किती नुकसान ?
राजधानी काराकसमध्ये भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी अनेक इमारती कोसळल्या, लोकांचा आक्रोश आणि किंकाळ्या सर्वदूर ऐकू येत होत्या. अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकून पडले होते, मदतीची याचना करत होते. अनेक घरे आणि इमारती कोसळल्या आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांना त्वरित तैनात करण्यात आले आहेत, अशी घोषणा गृहमंत्री डायोस्दादो कॅबेल्लो यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरून केली.


COMMENTS