नाशिक: नाशिक आणि राज्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश...
नाशिक: नाशिक आणि राज्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला नारेगाव भागातून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, निदा खान २५ मार्चपासून फरार होती. या काळात तिने अटक टाळण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याचाही प्रयत्न केला. तिने नाशिक रोड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र २ मे २०२६ रोजी न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला. जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध अधिक तीव्र केला होता. अटकेनंतर निदा खानची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला ‘ट्रान्झिट वॉरंट’साठी छत्रपती संभाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. आता तिला नाशिकला आणले जाणार असून, आज तिला नाशिक न्यायालयात हजर केले जाईल. निदा खानच्या अटकेमुळे या प्रकरणातील इतर धागेदोरे आणि फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


COMMENTS