उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. मंगलपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील अकारू गावात मंगळवारी एक तरुण आणि अल्पवयीन मुलगी मृता...
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. मंगलपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील अकारू गावात मंगळवारी एक तरुण आणि अल्पवयीन मुलगी मृतावस्थेत एका खोलीत आढळून आली होती.
प्राथमिक माहितीनुसार, तरुणाने अल्पवयीन प्रेयसीवर धारदार शस्त्राने हत्या केली, नंतर स्वत: गळफास घेत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली होती. घटनेनंतर पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.
तरुणाचा मामीच्या शेजारी राहणाऱ्या मुलीशी जडला जीव
घडलेल्या घटनेनुसार, तरुणाचे वय 25 वर्षे होते. तो काही वर्षांपूर्वी कानपूर देहात येथील मामीच्या गावात राहत होता. यादरम्यान त्याची मामीच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीशी ओळख झाली, नंतर ओळखीचे नात्यात रुपांतर झाले आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, या घटनेची गावात एकच चर्चा झाली.
तरुणाने अल्पवयीन मुलीची हत्या करून स्वत:ला संपवलं
मंगळवारी दोघांमध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद विवाद झाला होता. वादानंतर तरुणाने अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने हल्ला करत तिची हत्या केली. यानंतर तिला एका खोलीत फेकून दिलं आणि स्वत: गळफास घेत जीवन संपवलं. काही तास उलटून गेले मात्र दोघेही बाहेर न आल्याने परिसरातील रहिवाशांना भलताच संशय बळावला गेला. नागरिकांनी खोलीत जाऊन पाहिले असता, सर्व चित्र विचित्र झालं होतं.
गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मंगलपूर पोलीस ठाणे घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी घटनास्थळाचा ताबा घेत तपास सुरू केला. न्याय वैद्यक पथकाने घटनास्थळावरून अनेक मुद्दे आणि पुरावे गोळा केले. नंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, हे प्रकरण प्रथमदर्शनी प्रेमप्रकरणाचे वाटत असले तरीही सर्वच बाजू लक्षात घेत पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेले आहे.


COMMENTS