प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर जुन्नर : डिसेंट फाउंडेशन, पुणे , हायस्पीड स्किल हब जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने “ मोफत शिवणकला प्रश...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
जुन्नर : डिसेंट फाउंडेशन, पुणे , हायस्पीड स्किल हब जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने “ मोफत शिवणकला प्रशिक्षण समारोप तसेच प्रमाणपत्र वाटप” हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता,त्याचा सांगता समारंभ गोळेगाव येथे संपन्न झाला.
यावेळी डिसेंट फाउंडेशनच्या वतीने सौ साधना प्रीतम काळे व सौ कुंदा अनिल जाधव या दोन आदिवासी कुटुंबातील गरजू महिलांना शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले .
४० दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये महिलांना शिवणकलेचे सखोल मार्गदर्शन देण्यात आले तसेच त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले . या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे व रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा असल्याचे डिसेंट फाउंडेशचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी यावेळी सांगितले .
या प्रसंगी जुन्नर पंचायत समितीच्या सभापती कमलताई शेळकंदे , जिल्हा परिषद सदस्या डॉ छायाताई तांबे ,सोनाबाई दाभाडे ,पंचायत समिती सदस्या निलमताई आमले , हायस्पीड स्किल हबचे संस्थापक दिलीप भगत,डिसेंट फाउंडेशचे सचिव डॉ .एफ.बी.आतार,संचालक आदिनाथचव्हाण,पांडुरंग तोडकर, संदीप ताजने, गणेश मेहेर, बेलसर च्या सरपंच नीता ताजने, गोळेगावच्या माजी सरपंच अलकाताई, ज्योती डोके ,पोलीस पाटील कविता बिडवई ,सुचित्रा कोकणे ,पल्लवी वाणी ,सुशीला शेटे ,प्रशिक्षक छाया पाटील, अर्चना ताम्हाणे ,मनिषा काळे व प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
गरजू महिलांना जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत रबविल्या जाणाऱ्या योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मत यावेळी सभापती व जिल्हा परिषद सदस्यांनी यावेळी व्यक्त केले.




COMMENTS