पुणे : महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आ...
पुणे : महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नियमित वेळेपेक्षा केवळ दोन तास सेवा देऊन पूर्ण वेतन घेत असल्याचे समोर आले आहे.
यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या कमला नेहरू रुग्णालयातील रुग्णसेवांवर परिणाम झाला आहे
मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयाच्या बाजूला हे वैद्यकीय महाविद्यालय आहे. रुग्णालयात तातडीची वैद्यकीय सेवेपासून स्त्रीरोग व प्रसूती, अस्थिव्यंगोपचार, बालरोग, हृदयरोग, मेडिसिन, नेत्रोपचार, सामान्य शस्त्रक्रिया आदी विभाग आहेत. येथे वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांतील वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हणजेच प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांनी रुग्णसेवा देणे अपेक्षित आहे.
मात्र काही विभागाचे डॉक्टर हे केवळ हजेरी लावून दोन तासांत निघून जातात आणि पूर्ण आठ तासांचा पगार घेतात. याबाबत कमला नेहरू रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारही केली. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. सामान्य शस्त्रक्रिया विभाग, आपत्कालीन कक्ष, अस्थिव्यंगोपचार, नेत्रोपचार व मानसोपचार विभागात महाविद्यालयाचे डॉक्टर पूर्ण सेवा बजावत नसल्याची माहिती येथील वैद्यकीय सूत्रांनी दिली.
याबाबत अद्याप कोणत्याही डॉक्टरांची तक्रार आलेली नाही. अशी तक्रार आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.''
खासगी प्रॅक्टिस जोमात
येथील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस न करण्याबद्दल भत्ता (नॉन प्रॅक्टिसिंग अलाउंस) दिला जातो. तरीही काही डॉक्टर खासगी दवाखान्यांत राजरोसपणे प्रॅक्टिस करतात. त्यांनी त्यांची माहिती देखील ऑनलाइन उपलब्ध केलेली आहे. म्हणजेच खासगी प्रॅक्टिस न करण्याबद्दल दिला जाणारा भत्ता घ्यायचा व दुसरीकडे खासगी प्रॅक्टिसचा पैसा देखील लाटायचा, असा दुहेरी लाभ काही वरिष्ठ डॉक्टर घेत आहेत.


COMMENTS