उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये बागेत आंबे आणण्यास गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता झाली. शनिवारी सकाळी तिचा मृतदेह एका झाडीत आढळून आला होता. तिच्या...
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये बागेत आंबे आणण्यास गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता झाली. शनिवारी सकाळी तिचा मृतदेह एका झाडीत आढळून आला होता. तिच्या तोंडात कापड कोंबलेलं आढळून आलं होतं.
तिचा मृतदेह नग्नवस्थेत होता आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. या प्रकरणी पथकही घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता.
मुलगी आंबे आणण्यासाठी गेली परतली नाही..
गावातील एक मुलगी प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी ती शाळेत गेली नव्हती, त्या दिवशी सकाळी ती बागेतून आंबे आणायला घरातून बाहेर पडली असता, पुन्हा परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही.
कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुटुंब, गावकरी आणि पोलिसांसह विद्यार्थ्याता सतत शोध सुरू ठेवला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी बागेपासून काही अंतरावर असणाऱ्या मक्याच्या शेतात विद्यार्थीनीचा मृतदेह आढळून आला होता.
तोंडात कापडाचा बोळा कोंबला अन् विद्यार्थिनी नग्नवस्थेत
ही घटना गावभर पसरली होती. विद्यार्थिनीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता आणि विद्यार्थिनी नग्नवस्थेत आढळून आली होती. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला होता. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोक व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हत्येचा संशय व्यक्त केला होता.
अशातच एसपी विश्वजीत श्रीवास्तव, एएसपी डी.पी तिवारी, महसी सर्कस ऑफिसर पवन कुमार आणि इन्स्पेक्टर-इन-चार्ज प्रदीप कुमार सिंह हे पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


COMMENTS