रिटायर झाला अन् प्रेग्नंट मुलीसह सगळं कुटुंबच संपवलं, हादरवून टाकणारी घटना...... | CrimeNama
Loading ...

रिटायर झाला अन् प्रेग्नंट मुलीसह सगळं कुटुंबच संपवलं, हादरवून टाकणारी घटना......

  एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह गर्भवती मुलगी आणि मुलाची निर्घृण हत्या केली आहे. ही थरारक घ...

 


एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह गर्भवती मुलगी आणि मुलाची निर्घृण हत्या केली आहे. ही थरारक घटना झारखंडमधील जमशेदपूरच्या ॲग्रिको परिसरात सोमवारी (11 मे) सकाळी घडली.

या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


निवृत्त झाला अन्..


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख रवींद्र प्रसाद सिंह अशी झाली असून, तो याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका स्टील कंपनीतून निवृत्त झाला होता. रवींद्रच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. सोमवारी (11 मे) सकाळी हा वाद टोकाला गेला आणि रागाच्या भरात त्याने आपल्याच कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात 55 वर्षीय पत्नी सरिता सिंह, 31 वर्षीय मुलगी सुप्रिया सिंह आणि 30 वर्षीय मुलगा रविशेख कुमार यांचा जागीच मृत्यू झाला.

रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह


पूर्व सिंगभूमचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पीयूष पांडे यांनी सांगितले की, आरोपीने कुऱ्हाड आणि हातोड्याने वार करून तिघांची हत्या केली. मृत मुलगी सुप्रिया ही गर्भवती असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक ॲग्रिको येथील कंपनी क्वार्टरमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना घरामध्ये तिन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड आणि हातोडा जप्त केला आहे.

मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे नाटक


एएसपी ऋषव त्रिवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा आरोपीची पत्नी स्वयंपाकघरात काम करत होती. आरोपी रवींद्र सिंह याने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र तो पोलिसांना तपासात सहकार्य करत नसून मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे नाटक करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या नृशंस हत्याकांडामुळे स्थानिक नागरिक पूर्णपणे हादरले आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4080,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1487,Dhule,14,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,451,India,738,Jalgaon,32,Jalna,17,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1769,Mumbai,427,Nagpur,51,Nashik,68,Politics,617,Pune,1915,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: रिटायर झाला अन् प्रेग्नंट मुलीसह सगळं कुटुंबच संपवलं, हादरवून टाकणारी घटना......
रिटायर झाला अन् प्रेग्नंट मुलीसह सगळं कुटुंबच संपवलं, हादरवून टाकणारी घटना......
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzFd63mwkIzPh_zjPqQqtrs8ICJ5v-DlXBGERs60-JrOTC64-7iR-zTzsihPHa0IgjTEGG_HlauuB9-Esdeiwo27wCZ3d4nHrB6ogva_057sgKmgKQ3Fg5zVP8S40z0Oie6NmBnG8j7Nr1HgngH8XUt59b3Wcpw7Ceae6MM7Bawez9LugHmW-Jh-h4ndE/s320/1002226794.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzFd63mwkIzPh_zjPqQqtrs8ICJ5v-DlXBGERs60-JrOTC64-7iR-zTzsihPHa0IgjTEGG_HlauuB9-Esdeiwo27wCZ3d4nHrB6ogva_057sgKmgKQ3Fg5zVP8S40z0Oie6NmBnG8j7Nr1HgngH8XUt59b3Wcpw7Ceae6MM7Bawez9LugHmW-Jh-h4ndE/s72-c/1002226794.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_47.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_47.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content