उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर परिसरात धाकट्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर टाकल्याने मोठा भावाला आपले प्राण गमवावे लागले. संधी साधून मोठ्या भाव...
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर परिसरात धाकट्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर टाकल्याने मोठा भावाला आपले प्राण गमवावे लागले. संधी साधून मोठ्या भावाला विटेने हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केली, नंतर मृतदेह झाडात फेकून पुरून दिला.
हा धक्कादायक प्रकार 29 एप्रिल 2026 रोजी या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हातावर 'दीपक' असे नाव गोंदवण्यात आलेल्या पुरुषाचा मृतदेह
चिरथवली पोलीस ठाणे परिसरातील बिरसली गावात एका कालव्यानजीक झुडपात, हातावर 'दीपक' असे नाव गोंदवण्यात आलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. जेव्हा ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता, तो रुकनपूर गावाचा रहिवाीस असलेला दीपक असल्याची
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, प्रकरण उघडकीस
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी 28 एप्रिलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हे प्रकरण उघडकीस आले. त्याच दिवशी दीपक हा दारूच्या नशेत असताना त्याचा धाकटा भाऊ सचिन त्याला आपल्या बाईकवरून सोबत घेऊन गेला होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत सीसीटीव्ही तपासले आणि सचिनची कसूनपणे चौकशी केली होती, पण हे सत्य नंतर सत्य समोर आले.
दीपक अनेकदा दारू पिऊन पत्नीशी गैरवर्तन करायचा
सचिनने सांगितलं की, दीपक अनेकदा दारू पिऊन पत्नीशी गैरवर्तन करायचा आणि तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. दारूचा खर्च भागवण्यासाठी त्याला जमीन विकायची होती. या सगळ्यांच्या जाचाला कंटाळून सचिनने बिरासली कालव्यानजीक दीपकची निर्घृणपणे हत्या केली आणि मृतदेह झुडपात पुरला. नंतर तो गांभीर्याने मारेकरी भाऊ घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, पोलिसांनी सचिनला अटक केली आणि हल्ला केलेली विट घटनास्थळावरून जप्त केली.
या प्रकरणाची माहिती देताना, सीओ रवी शंकर मिश्रा म्हणाले की, 29 एप्रिल रोजी चरथवल पोलीस ठाणे परिसरातील बिरालसी कालव्यानजीक एक मृतदेह आढळून आला होता. दीपकच्या हातावर गोंदण होते, त्याच गोंदणावरून मृतदेहाचे नाव दीपक असल्याची ओळख पटली. कुटुंबीयांनासोबत घेऊन पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सतत तपासणी केली आणि चौकशी केली. 28 एप्रिल रोजी सायंकाळी धाकटा भाऊ सचिन त्याला बाईकवरून घेऊन गेला होता, असे दिसून आले. दीपक हा दारूच्या नशेत मद्यधुंद होता, त्याच्यावर विटेने हल्ला करून मारहाण केली आणि ठकलून ठार केले.


COMMENTS