मराठी चित्रपटासृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राजा शिवाजी ठरला आहे. भारतात 93 कोटी एवढी या चित्रपटाने आतापर्यंत कमाई केली आहे. तसेच जगभ...
मराठी चित्रपटासृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राजा शिवाजी ठरला आहे. भारतात 93 कोटी एवढी या चित्रपटाने आतापर्यंत कमाई केली आहे. तसेच जगभराचा विचार केल्यास 114 कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे.
सैराट या चित्रपटाचा देखील या चित्रपटाने विक्रम मोडीत काढण्यात यश मिळावलं आहे. एवढंच नाही,तर बॉलिवूड सारख्या चित्रपटांना मागे टाकत मोठा ठसा उमटवण्यात दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुखला मोठं यश मिळालं आहे.
चित्रपटाची ब्लॉकबस्टर ओपनिंगलाच विक्रमांची नोंद झाली आणि पाहिल्याच दोन आठवड्यांमध्ये उल्लेखनीय सातत्य राखून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाहिलेल्या या महाकाव्याला तिसऱ्या वीकेंडमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये या चित्रपटाने चांगली प्रसिद्धी मिळवली. अशातच प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात भरभक्कम प्रतिसाद मिळत आहे.
भारतातील एकूण कमाई किती
पहिला आठवड्यात 57.70 कोटी
दुसरा आठवडा 27 कोटी
तिसऱ्या आठवड्यातील 15 व्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 1.70, तर 16 व्या दिवशी शनिवारी 2.90 कोटी, तसेच 17 व्या दिवशी म्हणजेच रविवारी 3.80 कोटी एवढी कमाई केली. एकूण भारतातील 93.90 कोटी एवढी कमाई केली. तसेच जगभरातील एकूण कमाई: 114.80 कोटी रूपयांऐवढी कमाई करण्यात आली.
राजा शिवाजीने सैराटचा विक्रम मोडला
राजा शिवाजी या चित्रपटाने सतराव्या दिवशी 100 कोटींचा विक्रम करून सैराटचा विक्रम मोडित काढला. मराठी चित्रपटासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. याआधी 'सैराट' हा 100 कोटींचा टप्पा पूर्ण करणारा पहिला सिनेमा होता. तर जगभरात 110 कोटी कमाई केली होती. हा रेकॉर्ड गेली 10 वर्षात कोणी मोडू शकलं नव्हतं, पण तो विक्रम मोडला गेला.


COMMENTS