स्वप्नवेध भाषण शिका क्लासेस चे मंगरूळ येथे उद्घघाटन समारंभ अतिरिक्त जमावबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख भारत सरकार ज्ञानेश्वर खिलारी साहेब ...
स्वप्नवेध भाषण शिका क्लासेस चे मंगरूळ येथे उद्घघाटन समारंभ अतिरिक्त जमावबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख भारत सरकार ज्ञानेश्वर खिलारी साहेब यांच्या हस्ते पार पडले समाजातील युवकांना व राजकीय साहित्यिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्व निर्माण करण्याच्या हेतूने उभे केलेल्या स्वप्नवेध क्लासेस या क्लासेसच्या माध्यमातून मिळणारे मानधन मंगरूळ येथील स्वप्नवेध अनाथालय मधील मुलांच्या भवितव्य साठी वापरले जाते त्यामुळे महाराष्ट्रातून या क्लासेसला चांगला प्रतिसाद मिळतो 43 ठिकाणी शाखा स्वप्नवेधने निर्माण करून हजारो वक्ते विचारपीठावर उभे करण्याचे कार्य करत आहे या उद्घाटन प्रसंगी ह. भ. प.हौसीराम महाराज विश्वासराव, कात्रज दुध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, भानुदास खराडे, लोकनियुक्त सरपंच मनीषा खिलारी, माजी लोकनियुक्त सरपंच ताराताई लामखडे, ग्रामसेवक प्रवीण खराडे, अशोक खिलारी, धोंडाबाई गोसावी, विठाबाई औटी, दादाभाऊ लामखडे, नारायण खुटाळ, चंद्रकांत ढगे, प्रभाकर नायकोडी, भाऊसाहेब घोलप, डॉ, आकाश भोजने, भरत भोजने, चंद्रशेखर भोजने, सूर्यकांत भोजने, दत्ता बारेकर, रोहित बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी बोलताना अतिरिक्त जमावबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख भारत सरकार ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले की युवकांना स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रांमध्ये आपले स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी वकृत्व स्किल ची फार गरज आहे सचिन भोजने यांनी जी संकल्पना केली ती समाजाला उपयोगी असून अनेक अनाथ निराधार लेकरांचे संगोपन करत असताना असे कार्य त्यांच्या हातून घडते ही गावासाठी कौतुक स्पद आहे भविष्यामध्ये शालेय मुलांनाही या क्लासेसच्या माध्यमातून लाभ मिळावा यासाठी स्वप्नवेध भाषण क्लासेस प्रयत्न करावा हे करत असताना आवश्यक पुस्तके देण्याचे त्यांनी शब्द दिला त्या पुस्तकातून अनेक मुलांना स्पर्धा परीक्षा राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात विविध विषयांवर ज्ञान प्राप्त होईल व क्लासेसच्या माध्यमातून मुलांना वकृत्व मिळेल यासाठी भविष्यात प्रयत्न करावा असे मत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी प्रवीण खराडे लोकनियुक्त सरपंच मनीषा खिलारी आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार नारायण खुटाळ यांनी मानले स्वप्नवेधच्या उपक्रमाच गावातून, पंचक्रोशीत कौतुक होत आहे निराधारांची सावली बनण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते या क्लासेसच्या माध्यमातून ते मदत मिळणार असून मुलांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी या क्लासेसचा मोठा उपयोग होत आहे असे मत संस्थेचे संस्थापक सचिन भोजणे यांनी मांडले


COMMENTS