काकी अन् पुतण्यानं मिळून काकाला संपवले, कारण वाचून हादरुनचं जाल..... | CrimeNama
Loading ...

काकी अन् पुतण्यानं मिळून काकाला संपवले, कारण वाचून हादरुनचं जाल.....

  एका तीस वर्षीय तरुणाच्या निर्घृणपणे करण्यात आलेल्या हत्येने चांगलीच खळबळ माजली आहे. धक्कादायक म्हणजे त्याची बायको, मेहुणी आणि दोघींच्या प्...

 


एका तीस वर्षीय तरुणाच्या निर्घृणपणे करण्यात आलेल्या हत्येने चांगलीच खळबळ माजली आहे. धक्कादायक म्हणजे त्याची बायको, मेहुणी आणि दोघींच्या प्रियकरांनी मिळून त्याला संपवलं.

या हत्येनंतर त्यांनी आत्महत्येचा बनाव रचला. मात्र पोस्ट मार्टममधून धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी आधी तरुणाला घरात ओलीस ठेवले, त्यानंतर त्याला विजेचे झटके दिले आणि शेवटी बळजबरीने विष पाजून त्याला संपवले. ही घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील असून, पवन कुमार ठाकूर (30) असे मृत तरुणाचे नाव आहे.


पुतण्यावरच जडला जीव


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभल येथील रहिवासी असलेल्या आंचलचा विवाह ६ वर्षांपूर्वी पवन कुमार ठाकूरसोबत झाला होता आणि त्यांना दोन वर्षांची एक मुलगीही आहे. काही काळापूर्वी पवन गावात राहत असताना, त्याच्या चुलत भावाचा मुलगा अंकित याचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. याच दरम्यान आंचल आणि अंकित यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पवनला जेव्हा या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली, तेव्हा वाद टाळण्यासाठी तो गाव सोडून कुंदनपूर येथे राहू लागला. मात्र, तरीही आंचलने अंकितसोबतचे आपले संबंध सुरूच ठेवले. दरम्यानच्या काळात आंचलची बहीण शिखा हिची मैत्रीही जयंतलपूर येथील अजय दिवाकर याच्याशी झाली आणि दोन्ही बहिणींनी मिळून पवनला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला.

आधी करंट दिला आणि नंतर पाजले विष


गेल्या शुक्रवारी संध्याकाळी पवन जेव्हा आपली ड्युटी संपवून घरी परतला, तेव्हा आंचलने मुद्दाम त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढवून आंचल आणि शिखा या दोन्ही बहिणींनी पवनला दोरीने बांधले आणि फोन करून आपापल्या प्रियकरांना घरी बोलावून घेतले. यानंतर या चौघांनी मिळून आधी पवनला विजेच्या तारांनी करंट दिला आणि नंतर त्याच्या तोंडात बळजबरीने विष पाजले. पोलीस चौकशीत समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा पवन वेदनेने तडफडत होता, तेव्हा हे चारही आरोपी त्याच घरात बसून पार्टी करत होते.

पोलिसी खाक्या दाखवताच...


आंचलने पवनच्या बहिणींना फोन करून सांगितले की, पवनने काहीतरी विषारी पदार्थ खाल्ला आहे. नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर आंचलने पवनच्या पोस्ट मार्टमला कडाडून विरोध केला, ज्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. शनिवारी संध्याकाळी आलेल्या पोस्टामॉर्टम अहवालात पवनच्या शरीरावर विजेच्या करंटचे चट्टे आणि विषबाधा झाल्याची पुष्टी झाली. यानंतर आंचलला पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी पत्नी आंचल, तिची बहीण शिखा आणि त्यांचे प्रियकर अंकित व अजय दिवाकर या चौघांना अटक करून तुरुंगात पाठवले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4114,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,2,Crime,1517,Dhule,14,Entertainment,57,Gadchiroli,5,Health,452,India,760,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1772,Mumbai,431,Nagpur,51,Nashik,69,Politics,617,Pune,1920,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: काकी अन् पुतण्यानं मिळून काकाला संपवले, कारण वाचून हादरुनचं जाल.....
काकी अन् पुतण्यानं मिळून काकाला संपवले, कारण वाचून हादरुनचं जाल.....
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiDYwnn8LHW0Jlq91nePtnH-LHjAeHwV0tjaPTjHtIBEoR72bWpRevFf6GEfQPk_4fVuUhszYoh0yxifZVdWboGDEgN7k5An3rhjtjGgma2LVgjOgnBkLiPUM1gfZtmg5y_J-7KF1QaSQzFS6nT-IHN9B9lnaHSj9VYyBu1ckGLB7zAtinJtFJHQlN2soU/s320/1002268793.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiDYwnn8LHW0Jlq91nePtnH-LHjAeHwV0tjaPTjHtIBEoR72bWpRevFf6GEfQPk_4fVuUhszYoh0yxifZVdWboGDEgN7k5An3rhjtjGgma2LVgjOgnBkLiPUM1gfZtmg5y_J-7KF1QaSQzFS6nT-IHN9B9lnaHSj9VYyBu1ckGLB7zAtinJtFJHQlN2soU/s72-c/1002268793.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_302.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_302.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content