अहिल्यानगर) (प्रतिनिधी)_सातत्याने दर्जेदार मराठी साहित्याचा शोध घेणारे व अभ्यास करणारे एक नवोदित लेखक प्राध्यापक आनंदा डावरे सर यांना नुकताच...
अहिल्यानगर) (प्रतिनिधी)_सातत्याने दर्जेदार मराठी साहित्याचा शोध घेणारे व अभ्यास करणारे एक नवोदित लेखक प्राध्यापक आनंदा डावरे सर यांना नुकताच राज्य पातळीवरील उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या उत्कृष्ट मराठी साहित्य निर्मिती बद्दल त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे त्यांच्या मुक्या झाडांच्या कविता या पहिल्याच काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाने गौरवलेले आहे त्यानंतर आश्रम (कथासंग्रह) शेत शिवार( काव्यसंग्रह )आणि आता डोह आणि इतर कथा (कथासंग्रह) हा कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे डोह आणि इतर कथा या कथासंग्रहाला राज्य पातळीवरील पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार देखील मिळालेला आहे डोह' विंचू' घरटे' दप्तर 'बाप' बंडूचे राज्य' भूक बळी' घाट 'सायपन. इत्यादी कथांना राज्य पातळीवरील प्रथम क्रमांकाची पारितोषिकेही मिळालेली आहेत.
सातत्याने नवोदित साहित्यिकांना स्वतःचे एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून गेली वीस वर्षापासून ते आंतरभारती मासिकाचे काही खास विशेष अंक प्रकाशित करीत असतात दरवर्षी विविध लेखन स्पर्धांचे राज्य पातळीवर आयोजन करीत असतात विविध दैनिके पाक्षिके मासिके व विविध दिवाळी अंकातून त्यांच्या विविध कथा कविता व प्रासंगिक लेख प्रकाशित होत असतात
मराठी भाषेची अस्मिता वाढवून टिकवून व निकोप भावनेने साहित्य क्षेत्राची सतत निस्वार्थी सेवा करणाऱ्या प्राध्यापक व साहित्यिकांची महाराष्ट्र राज्य पातळीवर खास निवड केली जाते मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणखी उंचीवर नेण्याचे कार्य करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान तालुका श्रीरामपूर या संस्थेच्या वतीने नुकतेच चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२६ नुकताच संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्राध्यापक आनंदा डावरे यांना हा साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे प्राध्यापक आनंदा डावरे सर यांना राज्य पातळीवर मिळालेला हा विसावा पुरस्कार आहे त्यामुळे समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रातून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे


COMMENTS