दौंडमध्ये रिलॅक्स इन लॉजवर छापा; सहा महिलांची सुटका, दोन बांगलादेशी महिला ताब्यात | CrimeNama
Loading ...

दौंडमध्ये रिलॅक्स इन लॉजवर छापा; सहा महिलांची सुटका, दोन बांगलादेशी महिला ताब्यात

  दौंड : गोपाळवाडी ( ता. दौंड) येथील लॉज वर छापा टाकून वेश्याव्यवसाय करण्याकरिता आणलेल्या सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन ...

 


दौंड : गोपाळवाडी ( ता. दौंड) येथील लॉज वर छापा टाकून वेश्याव्यवसाय करण्याकरिता आणलेल्या सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन बांगलादेशी माहिलांचा समावेश आहे.पुणे ग्रामीण पोलिस दलाची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि दौंड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. 

दौंड - कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गावर चैतन्य लॉन्स समोरील आनंद हॉटेलच्या मागील रिलॅक्स इन लॉज वर ३० मे रोजी धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. हॉटेल आनंदच्या मागील बाजूस रिलॅक्स इन मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्यााची माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने एक बनावट ग्राहक पाठविला होता. बनावट ग्राहकास लॉजमध्ये महिलांची निवड करण्यासाठी पैसे घेऊन पाठविण्यात आले होते. त्यावेळी लॉजमधील महिलांकडून पैशांच्या मोबदल्यात शरीरसंबंध ठेवण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे निष्पन्न झाले.


बनावट ग्राहकाने वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती संकेताद्वारे दिल्यानंतर पोलिस पथकांनी लॉज वर छापा टाकला. छाप्यात लॉज मधील आठ खोल्यांमध्ये हा व्यवसाय सुरू असल्याचे आणि त्यासाठी एकूण सहा महिला आणल्याचे समोर आले. सहा पैकी दोन महिला बांगलादेशी आहेत.


दौंड पोलिस ठाण्यात लॉजचा व्यवस्थापक मनोज अनिल पवार ( वय ३४, रा. दत्तनगर, फलटण, जि. सातारा) याच्याविरूध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार निखिल जाधव यांनी दौंड पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार लॉज चालक मनोज पवार याच्याविरूध्द स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत सापडलेल्या सहा महिलांची सुटका करून त्यांना आवश्यक ती मदत व समुपदेशनासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.


दौंड नगरपालिकेचा माजी नगरसेवक नंदू शंकर पवार ( रा. गजानन सोसायटी, दौंड) याच्याकडून संशयित आरोपी मनोज पवार याने हे लॉज चालविण्यासाठी घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ( अजित पवार गट) नेते असणारे नंदू पवार हे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी संचालक आहेत.


छाप्यात दोन महिला बांगलादेश मधील असल्याने त्यांच्यासंबंधी प्राप्त माहिती दहशतवाद विरोधी पथकाला पुढील कार्यवाही करण्याकरिता देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल गावडे, सहायक उप निरीक्षक सचिन घाटगे, हवालदार अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, अमिर शेख, महिला अंमलदार दिपाली वडवकर, सुषमा गायकवाड, आदींनी या कारवाईत भाग घेतला.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4080,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1487,Dhule,14,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,451,India,738,Jalgaon,32,Jalna,17,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1769,Mumbai,427,Nagpur,51,Nashik,68,Politics,617,Pune,1915,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: दौंडमध्ये रिलॅक्स इन लॉजवर छापा; सहा महिलांची सुटका, दोन बांगलादेशी महिला ताब्यात
दौंडमध्ये रिलॅक्स इन लॉजवर छापा; सहा महिलांची सुटका, दोन बांगलादेशी महिला ताब्यात
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpWepJVK6au1Vd_xCl2ayvg0q8qigRIVsFNeA3M8NVtbxBdOkFbBq6LXw3mc9EAkjX9AtZ31fmKXY2SGokPXkr8mLU40WKGr-vkXxYcGroWmPiQGiozHBnwjNUU4z-lJyd6OQYDnEFVtKNMUzIdva37DazdZMQZ4-M6lvK-4h-JITfdx306oJA6zXKWhU/s320/n71432716517802462485397b0ae145ee07ef0a6cc9f159a35d81ef8dc6dda1e657e8143ac94a1e566ea497.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpWepJVK6au1Vd_xCl2ayvg0q8qigRIVsFNeA3M8NVtbxBdOkFbBq6LXw3mc9EAkjX9AtZ31fmKXY2SGokPXkr8mLU40WKGr-vkXxYcGroWmPiQGiozHBnwjNUU4z-lJyd6OQYDnEFVtKNMUzIdva37DazdZMQZ4-M6lvK-4h-JITfdx306oJA6zXKWhU/s72-c/n71432716517802462485397b0ae145ee07ef0a6cc9f159a35d81ef8dc6dda1e657e8143ac94a1e566ea497.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_219.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/05/blog-post_219.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content