प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला समर कॅम्प उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला, अशी माहिती समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
या समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कॅम्पदरम्यान विद्यार्थ्यांसाठी योगा, चित्रकला, हस्तकला, संगीत, फनी गेम्स, झांज पथक, लाठी-काठी चालवणे, नृत्य, व्यक्तिमत्व विकास, वक्तृत्व कला तसेच विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
या उन्हाळी वर्गासाठी क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे व पर्यवेक्षक सखाराम मातेले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रामचंद्र मते यांच्या नियोजनाप्रमाणे क्रीडा शिक्षक विनायक वऱ्हाडी व सुरेश काकडे यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडली.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला तसेच आत्मविश्वास, शिस्त आणि टीमवर्कची भावना विकसित झाली. विद्यार्थ्यांनी समर कॅम्पमधील प्रत्येक उपक्रमाचा मनापासून आनंद घेतला. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत समर्थ गुरुकुलच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे स्वागत केले.
समारोप कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत तसेच प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर उपस्थित होते.





COMMENTS