उल्हासनगर : उल्हासनगरच्या नेताजी चौकात दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित राड्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एका तरुणाच्या छातीत चाकू...
उल्हासनगर : उल्हासनगरच्या नेताजी चौकात दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित राड्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एका तरुणाच्या छातीत चाकू भोसकून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
टोळीने केला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, शिवमंदिर एकता नगर येथील तीन तरुण चहा पिण्यासाठी नेताजी चौकात आले होते. त्याच वेळी विठ्ठलवाडी परिसरातील पाच ते सहा जणांची टोळी तेथे आली आणि अचानक या तरुणांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गणेश वाघे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीत चाकू भोसकल्याने त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. जखमी तरुणावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमही दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.
प्रेमप्रकरणातून हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


COMMENTS