नियम बदलणार: मोबाईल पेमेंट, गॅस सिलिंडर ते टॅक्समध्ये सवलत, आजपासून बदलले 8 नियम, तुमच्या पगारावर होणार परिणाम | CrimeNama
Loading ...

नियम बदलणार: मोबाईल पेमेंट, गॅस सिलिंडर ते टॅक्समध्ये सवलत, आजपासून बदलले 8 नियम, तुमच्या पगारावर होणार परिणाम

  प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला काही ना काही नियम बदलत असतात. तुमच्यासाठी हा महिना अत्यंत खर्चिक ठरू शकतो. त्याचं कारण म्हणजे इराण विरुद्ध...


 

प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला काही ना काही नियम बदलत असतात. तुमच्यासाठी हा महिना अत्यंत खर्चिक ठरू शकतो. त्याचं कारण म्हणजे इराण विरुद्ध अमेरिका संघर्षामुळे आधीच महागाईचा भडका उडाला आहे. 

नवा महिना सुरू होताच आपल्या देशात दरवेळेप्रमाणे अनेक मोठे नियम बदलले आहेत. आज 1 जून 2026 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांचा थेट परिणाम आपल्या घरच्या बजेटवर आणि रोजच्या दिनचर्येवर पडणार आहे. स्वयंपाकघरातील मॅनेजमेंटपासून ते मोबाईलवरून होणारे ऑनलाईन पेमेंट आणि अगदी रेल्वे प्रवासापर्यंत अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत.


1. दोन गॅस कनेक्शन असणाऱ्यांना 30 दिवसांची डेडलाईन

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एकाच घरात एलपीजी आणि पीएनजी अशी दोन्ही कनेक्शन ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी नियम कडक केले आहेत. जर तुमच्या घरात पाईप गॅस कनेक्शन चालू असेल, तर आजपासून पुढील 30 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचे जुने एलपीजी सिलिंडर कनेक्शन सरेंडर करावे लागेल. ग्राहकांच्या सोयीसाठी गॅस कंपन्यांनी एक खास वाउचर व्यवस्था सुरू केली आहे. जर तुम्ही भविष्यात पीएनजी नसलेल्या भागात राहायला गेलात, तर याच वाउचरच्या आधारे तुम्हाला तुमचे जुने एलपीजी कनेक्शन पुन्हा चालू करून मिळेल.


2. गुगल पे, फोनपे वापरणाऱ्यांसाठी गुड न्यूज

ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी आणि चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होऊ नयेत म्हणून 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक मोठा बदल केला आहे. 1 जूनपासून तुम्ही गुगल पे , फोनपे किंवा पेटीएमवरून कोणालाही पैसे पाठवताना, यूपीआय पिन टाकण्यापूर्वी स्क्रीनवर त्या व्यक्तीचे तेच अधिकृत नाव दिसेल जे त्याच्या बँक खात्यावर जे दिलं आहे तेच दिसणार आहे. यामुळे पैसे योग्य व्यक्तीलाच जात आहेत याची खात्री करून घेणे सोपे होईल.


3. एटीएममधून पैसे काढणे महागणार

देशातील अनेक प्रमुख बँकांनी दरमहा मिळणाऱ्या 3 ते 5 मोफत एटीएम व्यवहारांच्या नियमांमध्ये अधिक कडक पावले उचलली आहेत. ही मोफत मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढणे, मिनी-स्टेटमेंट तपासणे किंवा शिल्लक रक्कम पाहणे यासाठी आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागणार आहे.


4. पॅन कार्डच्या नियमात बदल

बँकेत पैसे जमा करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता ₹50,000 पर्यंतची रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी पॅन कार्ड सक्तीचे असण्याच्या नियमात थोडी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, जर तुम्ही ₹20 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे व्यवहार करत असाल किंवा कौटुंबिक गिफ्टचे व्यवहार असतील, तर वैध पॅन कार्ड असणे अजूनही अनिवार्य राहील.


5. 15 जूनपर्यंत भरावा लागणार ॲडव्हान्स टॅक्स

ज्या करदात्यांची अंदाजे Net Tax Liability 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना १५ जूनपर्यंत त्यांच्या एकूण कर दायित्वाचा 15% हिस्सा ॲडव्हान्स टॅक्स म्हणून जमा करावा लागेल. हा कर वेळेत न भरल्यास दरमहा 1% दराने दंड आकारला जाईल.


6. टॅक्स सवलतींमध्ये मोठी वाढ

जुन्या कर रचनेअंतर्गत काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला सरकारने मोठा फायदा दिला आहे. मुलांचा शैक्षणिक भत्ताआता प्रतिमहिना 3,000 पर्यंत आणि हॉस्टेल भत्ता प्रतिमहिना 9,000 पर्यंत टॅक्स फ्री करण्यात आला आहे. याशिवाय, पुणे, बेंगलुरु, हैदराबाद आणि अहमदाबाद या मोठ्या कॉर्पोरेट हब शहरांचा आता 50% एचआरए टॅक्स सवलतीच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.


7. रेल्वेचे वेळापत्रक बदललं

रोज लोकल किंवा उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजपासून मोठा बदल झाला आहे. साउदर्न रेल्वेने चेन्नई बीच-तांबरम-चेंगलपट्टू रेल्वे कॉरिडोअरवर धावणाऱ्या 200 हून अधिक उपनगरीय ट्रेनचे वेळापत्रक पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपली ट्रेन चुकवू नये म्हणून स्टेशनवरील डिस्प्ले बोर्ड किंवा डिजिटल ॲप्सवर नवीन वेळ तपासूनच घराबाहेर पडावे.


8. पेट्रोल, डिझेल आणि विमानांच्या इंधनावरील एक्स्पोर्ट ड्युटी कपात

केंद्र सरकारने शनिवारी घेतलेल्या निर्णयानुसार, आज 1 जूनपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवर लागणारे शुल्क कमी केले आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर 1.5 रुपये प्रति लीटर, डिझेलच्या निर्यातीवर 3 रुपये प्रति लीटर आणि विमानांच्या इंधनावरील करात तब्बल 7 रुपये प्रति लीटरची कपात करण्यात आली आहे.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4080,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1487,Dhule,14,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,451,India,738,Jalgaon,32,Jalna,17,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1769,Mumbai,427,Nagpur,51,Nashik,68,Politics,617,Pune,1915,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: नियम बदलणार: मोबाईल पेमेंट, गॅस सिलिंडर ते टॅक्समध्ये सवलत, आजपासून बदलले 8 नियम, तुमच्या पगारावर होणार परिणाम
नियम बदलणार: मोबाईल पेमेंट, गॅस सिलिंडर ते टॅक्समध्ये सवलत, आजपासून बदलले 8 नियम, तुमच्या पगारावर होणार परिणाम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjviUFZLZI_9oYG7RHoBDsK7VG5_stdYWb7ltuuTA6txLQUN5YNM3nhCGw9XplAk0ILqNh0_qMXRtBywX3zkALbUFiQKy0CY1pNwy0POf4FA2P_UX9jGQ9pWJyOBjiwH0N345JmoV4fHvA3KK6boacAXR-P93-xOZHR2bLhtrR76TCbsKWDh_UPgh8tLfw/s320/n7143724651780292667194667fc2b52d14904ddc83a7d7bb911a06ea943e1b3c648827393e8ce1122ca318.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjviUFZLZI_9oYG7RHoBDsK7VG5_stdYWb7ltuuTA6txLQUN5YNM3nhCGw9XplAk0ILqNh0_qMXRtBywX3zkALbUFiQKy0CY1pNwy0POf4FA2P_UX9jGQ9pWJyOBjiwH0N345JmoV4fHvA3KK6boacAXR-P93-xOZHR2bLhtrR76TCbsKWDh_UPgh8tLfw/s72-c/n7143724651780292667194667fc2b52d14904ddc83a7d7bb911a06ea943e1b3c648827393e8ce1122ca318.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/05/8.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/05/8.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content