'न विचारता गाडी का नेलीस?' वडिलांनी 19 वर्षीय मुलावर पेट्रोल ओतले अन्... | CrimeNama
Loading ...

'न विचारता गाडी का नेलीस?' वडिलांनी 19 वर्षीय मुलावर पेट्रोल ओतले अन्...

दक्षिण बेंगलोरच्या प्रगतीपुरा भागात 1 मे रोजी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. न विचारता दुचाकी नेल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका 45...



दक्षिण बेंगलोरच्या प्रगतीपुरा भागात 1 मे रोजी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. न विचारता दुचाकी नेल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका 45 वर्षीय वडिलांनी आपल्या 19 वर्षांच्या मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला.

आनंद डोड्डामणी असे आरोपी पित्याचे नाव असून, या घटनेत मुलगा मल्लिकार्जुन 40 टक्के भाजला आहे, तर आरोपी वडीलही 18 टक्के भाजले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.


वडिलांनी फोनवरुन केली शिवीगाळ


मिळालेल्या माहितीनुसार, आनंद हा व्यवसायाने गवंडी असून त्याला दारूचे व्यसन आहे. 1 मे रोजी सुट्टी असल्याने मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी वडिलांची दुचाकी घेऊन गेला होता. यामुळे संतप्त झालेल्या आनंदने मुलाला फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. मुलाने व्हिडिओ कॉल करून आपण मंदिरातच असल्याचे दाखवूनही आनंदचा राग शांत झाला नाही. रात्री मुलगा घरी परतल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. आनंदने मुलाला मारहाण केली आणि त्याला संपवून टाकण्याची धमकी दिली, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पेट्रोल ओतले अन् घडलं भयानक


रात्री साडे नऊच्या सुमारास वादाने टोक गाठले. संतापलेल्या आनंदने घरातून बाटलीत भरलेले पेट्रोल आणले आणि दुचाकीवर बसलेल्या मल्लिकार्जुनच्या अंगावर ओतले. दुर्दैवाने, त्याच वेळी घराबाहेर शेजारी चुलीवर जेवण बनवत होते. वाऱ्याच्या वेगामुळे चुलीतील ठिणगी उडून मल्लिकार्जुनच्या कपड्यांनी पेट घेतला आणि तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या झटापटीत पेट्रोलचे काही थेंब आनंदच्या अंगावरही पडल्याने तो देखील भाजला गेला. मुलाच्या किंकाळ्या ऐकून आई ईरम्मा आणि शेजाऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

वडिलांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल


जखमी पिता-पुत्राला तातडीने संजय गांधी रुग्णालयात आणि त्यानंतर व्हिक्टोरिया रुग्णालयातील बर्न वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. ईरम्माच्या तक्रारीवरून पोलिसांनी आनंदविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या दोघांवर उपचार सुरू असून, आरोपीची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका छोट्याशा वादाचे रूपांतर अशा भीषण घटनेत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4080,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1487,Dhule,14,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,451,India,738,Jalgaon,32,Jalna,17,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1769,Mumbai,427,Nagpur,51,Nashik,68,Politics,617,Pune,1915,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: 'न विचारता गाडी का नेलीस?' वडिलांनी 19 वर्षीय मुलावर पेट्रोल ओतले अन्...
'न विचारता गाडी का नेलीस?' वडिलांनी 19 वर्षीय मुलावर पेट्रोल ओतले अन्...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfkbc_kG4_5_yqjaiXV2lj_mGZ-1SFJrsxjWTLxpyiHCCX9h6xo3b6xI7y7DobqCAvBwzwG_xAEqvo-mWY3_22E6wF61XvcZyf7F_Oi8VBPRzhY1xw00uh1-ZFHC-v6WO6odF8dpZ22bL7KmljSfyfNg3ja9dG6Zc5YlmzCG_cwhXNL_pykhqE5RRiBgk/s320/1002195933.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjfkbc_kG4_5_yqjaiXV2lj_mGZ-1SFJrsxjWTLxpyiHCCX9h6xo3b6xI7y7DobqCAvBwzwG_xAEqvo-mWY3_22E6wF61XvcZyf7F_Oi8VBPRzhY1xw00uh1-ZFHC-v6WO6odF8dpZ22bL7KmljSfyfNg3ja9dG6Zc5YlmzCG_cwhXNL_pykhqE5RRiBgk/s72-c/1002195933.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/05/19.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/05/19.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content