उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या काकाने अमानुष अत्याचार के...
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या काकाने अमानुष अत्याचार केले. यानंतर पीडितेनं आपल्या वडिलांना याबाबत सांगितले असता, तिच्या वडिलांनी रक्षणाची भूमिका घ्यायची सोडून बापच शिकारी बनला.
तिला वाचवण्याऐवजी, त्या नराधमाने लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई कर दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
काका आणि बापाने अल्पवयीन लेकीवर केला लैंगिक अत्याचार
पतीच्या संतापाला कंटाळून आईने काही वर्षांपूर्वी घर सोडलं. आईच्या अनुपस्थितीचा फायदा घेत काकाने आपल्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी काकाने पीडितेला, काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमागे काकाने गेल्या काही महिन्यांपासून त्या चिमुरडीवर अमानुष आत्याचार सुरुच ठेवले होते.
या सततच्या लैंगिक अत्याचाराने त्रस्त झालेल्या किशोरवयीन मुलीने हिंमत दाखवून काकांच्या हैवानी कृत्याबाबत वडिलांना सांगितलं की, तिच्या वडिलांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दृष्ट बापाने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेनं मावशीशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
नराधमांनी पोलिसांच्या आवळल्या मुसक्या
पीडित मुलगी तिच्या मावशीसोबत पोलीस ठाण्यात गेली असता, तिने न्यायाची मागणी केली आणि हे प्रकरण उघडकीस आले. मुझफ्फर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, तात्काळपणे आरोपीवर गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी वडील आणि काकाला अटक करण्यात आली. या प्रकरणात पीडित मुलीचा जबाब नोंदवला जात असून कार्यवाही सुरु आहे.


COMMENTS