नाशिक : नाशिक धर्मांतर प्रकरणातील संशयीत आरोपी निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. जामीन अर्जात तिने गरोदर असल्याची माहिती दि...
नाशिक : नाशिक धर्मांतर प्रकरणातील संशयीत आरोपी निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. जामीन अर्जात तिने गरोदर असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. गरोदर असल्याकारणामुळे तिच्या या जामिन अर्जावर १८ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
निदा खान ही फरार असून तिचा शोध घेतला जात आहे. या सगळ्या परिस्थितीचा SIT कडून तपास सुरू आहे. दुसरीकडे निदा खान गर्भवती असल्याचा तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे. पहिल्याच बाळाच्या प्रतिक्षेत असताना जर अटक झाली तर पोटातील बाळावर हा मोठा अन्याय होईल असं तिचं म्हणणे आहे. तसेच अटक न करता, तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचाही दावा निदा खान हिने केला आहे. तुरुंगातील आरोपी शफीला झालेल्या मारहाणीमुळे सुरक्षा व्यवस्थेवरही निदा खान हिने उपस्थित केला आहे.
संबंधित प्रकरणाचा तपास केवळ साक्षीपुरता मर्यादित न राहता तांत्रिक पुराव्यांवर केंद्रित करण्यात आला आहे. संशयितांचे मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड, तसेच इतर डिजिटल माहिती तपासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता संबंधित कंपनीने नाशिकमधील कार्यालय तात्पुरते बंद ठेवले आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश देण्यात आले असून, याबाबत ईमेलद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
सुनावणीदरम्यान काही संशयितांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप न्यायालयासमोर मांडला होता. या गंभीर आरोपाची दखल घेत न्यायाधीश आर. सी. नरवाडिया यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तुरुंग प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.


COMMENTS