बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे खात्यात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाने माधवबाग येथील भाडेतत्त्वाच्या राहत्या घरात गळफास घेत जीव...
बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे खात्यात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाने माधवबाग येथील भाडेतत्त्वाच्या राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवलं. मृत तरुणाची नितीन पंडीत ढगे (वय 30) रा लोहारा ता. लोहार जिल्हा धाराशिव अशी ओळख पटली. या घटनेनं परळीतील माधवबाग परिसर हादरून गेला आहे. हा धक्कादायक प्रकार 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 ते 8 वाजता घडला. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. नितीनचे आठवड्यावर लग्न होते, पण त्याच्या संसाराची सुरुवात होण्याआधी अंत झाला.
नितीनने टोकाचं पाऊल उचलतं संपवलं जीवन
घडलेल्या घटनेनुसार, तरुण नितीन हा दोन दिवसांच्या सुट्टीवर आपल्या धाराशिव जिल्ह्यातील लोहार या गावी गेला होता. सुट्टी संपल्यानंतर तो कामावरती रुजू झाला आणि अशातच नितीनने टोकाचं पाऊल उचललं. नितीनला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी त्रास दिला होता त्यातूनच त्याने आपलं जीवन संपवलं. मात्र, जीवन संपवण्यामागचं हे अधिकृत कारण असू शकतं का? असा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत छडा लावण्याचा प्रयत्न केला.
संबंधित घटनेची माहिती मिळताच परळी शहरात पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला. या प्रकरणी मृत तरुणाचा मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी तपास केला असता, रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने कोणत्या कारणावरून टोकाचं पाऊल उचललं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, याबाबत कोणतीही एकही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


COMMENTS