बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दि...
बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. मुंबईतील गांधी भवनमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अजित पवार यांच्या अपात प्रकरणी एफआयआर दाखल करुन घ्या अशी मागणी करत काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीत आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. अर्ज माघारीसाठी आधी रोहित पवार आणि नंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शिष्टमंडळांने सपकाळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही सपकाळ यांना अर्ज माघारीसाठी विनंती केली होती.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, 'फ्री अँड फेअर निवडणूक होत नाही. निवडणूक अयोग भाजपची B टीम म्हणून काम करतेय. अशा परिस्थितीत वैचारिक लढा देण्यासाठी आम्ही बारामतीत उमेदवारी दिली.'
यापुढे बोलताना ते म्हणाले की, 'अजित पवार महाराष्ट्रातील मोठे नेते होतेच. त्यांच्या अपघाती निधनाचं दुःख सगळ्यांनाच. त्यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून काँग्रेसने माघार घ्यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला विनंती केली. आज त्यांच्या नेत्यांचं शिष्टमंडळ भेटलं. सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनीही सहकार्य करण्याची फोन करून विनंती केली. तसेच सुनेत्रा पवार मल्लिकार्जुन खर्गे यांनाही भेटल्या. त्यानंतर वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यांचही सपकाळ म्हणाले.
आज आमचे मित्र रोहित पवार यांनीही भेट घेऊन विनंती केली. दरम्यान एक हास्यास्पद अपरिपक्व वक्तव्य आलं यासंदर्भात त्यांनी दिलगिरी व्यक केलीत्यामुळे आम्ही अखेरीस आम्ही संस्कृती, सामंजस्य या भावनेतून माघार घेण्याचा निर्णय घेत असल्याचं सपकाळ यांनी जाहीर केलं.


COMMENTS