बोतार्डे : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे ग्रामपंचायत येथे आज मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ ...
बोतार्डे : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे ग्रामपंचायत येथे आज मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यानंतर उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना अभिवादन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जनार्दन मरभळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. बाळासाहेब खरात यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया,त्यातील मूलभूत अधिकार व कर्तव्ये,तसेच लोकशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये यांचा सखोल ऊहापोह केला.त्यांनी सांगितले की,बाबासाहेबांनी भारतीय समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आणि संविधानाच्या माध्यमातून देशाला एक मजबूत लोकशाही व्यवस्था दिली.ते पुढे म्हणाले की,आजच्या तरुणांनी संविधानातील मूल्ये केवळ अभ्यासापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या दैनंदिन जीवनातही अंगीकारली पाहिजेत. ग्रामसेवक प्रकाश नांगरे व विद्यमान सरपंच वंदना ताई डोळस व सतिश शिंदे यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन केले.
यावेळी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच वंदना ताई डोळस, ग्रामपंचायत सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जनार्दन मरभळ, सुलोचना मरभळ, संतोष मरभळ, माजी सरपंच पांडुरंग डावखर, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वास मरभळ, कुलदीप कोकाटे पोलीस पाटील, अमोल मरभळ पेसा अध्यक्ष, मनोहर कोकाटे माजी सैनिक, गौरी मरभळ पेसा मोबिलायझर, सुरेश खरात आर. पी. आय उपाध्यक्ष, बबन शिंदे, नवनाथ खरात, चैतन्य घोडे, बाळू आमले, लक्ष्मण डावखर, विजय पोटे, वैभव खरात, संतोष आमले ग्रामपंचायत शिपाई, राहूल मरभळ ग्रामपंचायत शिपाई पशुवैद्यकीय कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.


COMMENTS