दोन मित्रांमध्ये समलैंगिक संबंध निर्माण झाले, पण त्याची किंमत एका निष्पाप महिलेला चुकवाली लागली आहे. समलैंगिक संबंधात गुंतलेल्या जोडप्यापै...
दोन मित्रांमध्ये समलैंगिक संबंध निर्माण झाले, पण त्याची किंमत एका निष्पाप महिलेला चुकवाली लागली आहे. समलैंगिक संबंधात गुंतलेल्या जोडप्यापैकी एका तरुणाने साथीरादाच्या आईची हत्या केली.
आरोपीने महिलेला चाकूने भोसकून ठार मारलं. महिलेच्या हत्येचा खुलासा झाल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. ही घटना 15 एप्रिल 2026 रोजी घडल्याचे वृत्त आहे.
समलैंगिक संबंधातून महिलेची हत्या
नोएडा सेक्टर 113 पोलीस ठाणे परिसरात सरफाबाद गावात महिलेची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा पोलीस तपास करताहेत, यादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली, समलैंगिक संबंधावरून महिलेची हत्या करण्यात आली. मृत महिलेच्या मुलाचे आरोपीसोबत समलैंगिकसंबंध होते, यावरून तरुणाने आपल्या प्रियकराच्या आईलाच संपवलं.
आरोपीने घटनेचा दिला कबुलीनामा
या प्रकरणी पोलिसांनी शफीक उर्फ जावेदच्या मुसक्या आवळल्याचे सांगण्यात येते. पोलीस चौकशीदरम्यान आरोपी शफीकने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. मृत महिलेचे आरोपीशी समलैंगिक संबंध होते, हेच महिलेला मान्य नव्हते, महिलेच्या मृत्यूमागील हेच एक कारण होते. अशातच पोलिसांनी शफीकवर कारवाई करत त्याला अटक केली.
चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितलं त्याने मृत महिलेच्या मुलाला भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु महिला अडथळा ठरत होती. मृत महिलेच्या मुलाचे लग्न नात्यातील एका तरुणीशी होणार होते. मात्र, महिलेला हे मान्य नव्हते. तिला आपल्या मुलाला या प्रकरणातून दूरच ठेवायचे होते, तरुणाला हेच खटकल्याने त्याने आपल्या तरुण प्रियकराच्या आईच्या पोटाच चाकूने वार करत तिची हत्या केली.


COMMENTS